मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Local Trains: आजपासून तीन दिवस कर्जत-खोपोली लोकलच्या फेऱ्या रद्द; मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Local Trains: आजपासून तीन दिवस कर्जत-खोपोली लोकलच्या फेऱ्या रद्द; मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 09, 2023 07:11 AM IST

Central Railway Special Traffic Block: आजपासून तीन दिवस कर्जत-खोपोली लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Local Train
Local Train

Karjat-Khopoli locals Time Table: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड सुधारणेसाठी आजपासून पुढील तीन दिवसांसाठी (९ मे २०२३- ११ मे २०२३) विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला. या काळात यांत्रिक कामे करण्यात येणार असून अप, डाऊन आणि मिडल मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कर्जत-खोपोली फेऱ्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

आजपासून पुढील तीन दिवस कर्जतहून दुपारी १२ आणि १.१५ वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि खोपोलीहून सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४०ची कर्जत लोकलची फेरी रद्द करण्यात आली. या वेळेत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागणार आहे. याशिवाय, हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२७३१) आणि चेन्नई सेंट्रल-एलटीटी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१६४) उशीराने धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर दर रविवारी देखभालीचे काम करण्यासाठी मेगा ब्लॉक घोषित केला जातो. मात्र, रविवारी मोठ्या प्रमाणात नोकरदारांना, कामगारांना सुट्टी असते. त्यामुळे या मेगा ब्लॉकचा फारसा प्रभाव पडत नाही. पंरतु, पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवार ते गुरुवारपर्यंत कर्जत-खोपोली लोकल रद्द केल्याने नोकरदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग