मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पाणी भरण्याच्या वादावरून येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

पाणी भरण्याच्या वादावरून येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

May 20, 2022, 09:47 PM IST

    • पुण्यातील येरवडा कारागृहात उघडकीस आली आहे. पाणी भरण्याच्या वादावरून दोन कैद्यांनी एकमेकांना हाणामारी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात हे दोघे कैदी गंभीर जखमी झाले आहेत.
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

पुण्यातील येरवडा कारागृहात उघडकीस आली आहे. पाणी भरण्याच्या वादावरून दोन कैद्यांनी एकमेकांना हाणामारी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात हे दोघे कैदी गंभीर जखमी झाले आहेत.

    • पुण्यातील येरवडा कारागृहात उघडकीस आली आहे. पाणी भरण्याच्या वादावरून दोन कैद्यांनी एकमेकांना हाणामारी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात हे दोघे कैदी गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे : कारागृहात वर्चस्वावरून तसेच जेवणावरून हाणामा-या दाखवण्याचे अनेक सीन चित्रपटात तुम्ही पाहिले असाल. हे सीन नुसते चित्रपटातच नाही तर वास्तविक जीवनातही कारागृहात अनुभवायला येत असतात. अशीच एक घटना पुण्यातील येरवडा कारागृहात उघडकीस आली आहे. पाणी भरण्याच्या वादावरून दोन कैद्यांनी एकमेकांना हाणामारी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात हे दोघे कैदी गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार टिकलसिंह गब्बरसिंह, अजिनाथ लक्ष्मण गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. दोघांनी केलेल्या मारहाणीत कैदी सोनू शेटे, किशोर मंजुळे जखमी झाले आहेत. कारागृह अधिकारी अभिजीत यादव यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या घटनेची हकिगत अशी की, येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ कार्यालयासमोर पाणी भरण्याच्या वादातून कैदी टिकलसिंह, अजिनाथ गायकवाड यांचा सोनू शेटे, किशोर मंजुळेशी वाद ‌झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोघांनी सिमेंटच्या पत्र्याने शेटे आणि मंजुळेला मारहाण केली. यात शेटे आणि मंजुळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा