मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: डंपरने मुलीला चिरडले; पुण्यातील लोहगाव रस्त्यावरील घटना

Pune Accident: डंपरने मुलीला चिरडले; पुण्यातील लोहगाव रस्त्यावरील घटना

Sep 06, 2022, 04:30 PM IST

    • Pune accident : पुण्यात लोहगाव येथे सायकल वरून जाणाऱ्या मुलीला डंपरने धकड दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
Road Accident (HT_PRINT)

Pune accident : पुण्यात लोहगाव येथे सायकल वरून जाणाऱ्या मुलीला डंपरने धकड दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

    • Pune accident : पुण्यात लोहगाव येथे सायकल वरून जाणाऱ्या मुलीला डंपरने धकड दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

पुणे : पुण्यात एका भरधाव जाणाऱ्या डंपरने सायकल वरून क्लासला जाणाऱ्या एका मुलीला जोरदार धडक दिली. या घटनेत मुलगी डंपरच्या चाकाखाली आल्याने तिचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना लाेहगावात पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ घडली. घटनेनंतर डंपर चालक फरार झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

रोशनी बाबा अंगरखे (वय १६, रा. शौर्या पार्क, पठारे वस्ती, लोहगाव) असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाबा पंढरीनाथ अंगरखे (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलोसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी अंगरखे ही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता सायकलवरून क्लासला जात होती. ती पठारे वस्तीतील एम जी ब्रिलिएंट शाळेजवळ आली असता एका भरधाव डंपरने तिला जोरदार धडक दिली. यामुळे ती खाली पडून डंपरच्या चाकाखाली आली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या परिसरात झालेला हा दुसरा अपघात आहे. येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. असे असतानाही अवजड वाहने वेगाची मर्यादा न पाळता वाहने सुसाट पळवत असतात. यामुळे या मार्गावरील अपघात हे वाढले आहेत. या मार्गावरील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा