मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: शेयर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्धाला २२ लाखांना गंडवले

Pune Crime: शेयर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्धाला २२ लाखांना गंडवले

Sep 05, 2022, 06:54 PM IST

    • पुण्यात एका वृद्धाला शेयर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २२ लाख रुपयांनी गंडावण्यात आले.
Pune cyber crime (REPRESENTATIVE IMAGE) (HT_PRINT)

पुण्यात एका वृद्धाला शेयर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २२ लाख रुपयांनी गंडावण्यात आले.

    • पुण्यात एका वृद्धाला शेयर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २२ लाख रुपयांनी गंडावण्यात आले.

पुणे : पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक नागरिकांना ऑनलाइन गंडा घालून त्यांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केली जात आहे. अशाच एका वृद्धाला शेयर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २२ लाख रुपयांनी गंडावण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik news : ३ वर्षाची चिमुकली विहिरीत पडली, वाचवण्यासाठी आईनेही मारली उडी, मायलेकींचा बुडून मृत्यू

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, ‘त्या’ अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, आता..

Nagpur Crime : पतीशी भांडणानंतर महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या, मृतदेहासोबत भटकत राहिली

Wardha News : लाईट गेल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वानवडी येथे राहायला आहे. ते सेवानिवृत्त आहेत. चोरट्याने शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारी एक लिंक ज्येष्ठ नागरिकाला पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर ज्येष्ठ नागरिकाने संपर्क साधला. तेव्हा शेअर बाजारातील व्यवहारासाठी खाते उघडावे लागेल, असे सांगून चोरट्याने त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाकडून पैसे उकळले. चोरट्याने ऑनलाइन पद्धतीने ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल २२ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना शेअर बाजाराचा कुठलाच लाभ दिला गेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वृद्ध नागरिकाने वानवडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित शिवले तपास करत आहेत.

शहरात सायबर चोरीच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. फोन करून, ऑनलाइन माध्यमातून चोरटे अनेकांची फसवणूक करत आहेत. अशा प्रकरच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता, आपले बँकेचे खाते आणि पासवर्ड कुणालाही शेयर करू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या