मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar: रोहित पवारांना भावली फडणवीसांची कार्यशैली; चर्चा तर होणारच!

Rohit Pawar: रोहित पवारांना भावली फडणवीसांची कार्यशैली; चर्चा तर होणारच!

Aug 11, 2022, 11:49 AM IST

    • Rohit Pawar praises Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं आहे.
Rohit Pawar - Devendra Fadnavis

Rohit Pawar praises Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं आहे.

    • Rohit Pawar praises Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं आहे.

Rohit Pawar praises Devendra Fadnavis: राज्यातील पदभरतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो रोहित पवार यांनी ट्वीट केला असून त्यांनी फडणवीस यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

रोहित पवार यांनी फडणवीसांच्या कामाची तुलना अजित पवार यांच्या कामाशी केली आहे. 'फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कशासाठी झाली होती भेट?

सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता एमपीएससी मार्फतच भराव्यात अशी लेखी मागणी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे. त्यासाठीच त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. दुय्यम सेवा मंडळे आणि जिल्हा निवड समिती महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता असून त्यातून भ्रष्टाचार होत असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळं भरती प्रक्रियेत विश्वसनीयता राहत नाही. राज्य लोकसेवा आयोग हे विश्वसनीय व पारदर्शकता असलेलं एकमेव माध्यम आहे. सध्या राज्याच्या विविध विभागांमध्ये सुमारे अडीच लाख पदं रिक्त आहेत. ही पद लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत. मात्र, यापैकी केवळ २५ हजार पदं राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येतात. उर्वरीत पदांची भरती दुय्यम सेवा मंडळे किंवा जिल्हा निवड समित्यांमार्फत केल्यास पारदर्शकता राहणार नाही, याकडं रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. राज्य सेवा आयोगावर ताण असला तरी आयोगाला ताकद दिल्यास सर्व भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवता येऊ शकते, असा विश्वास रोहित पवार यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा