मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Pankaja Munde : पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Jan 13, 2023, 08:25 PM IST

    • Pankaja Munde Join Shiv Sena : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि सुनिल शिंदेंनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुली ऑफर दिली आहे.
Devendra Fadnavis On Pankaja Munde (HT)

Pankaja Munde Join Shiv Sena : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि सुनिल शिंदेंनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुली ऑफर दिली आहे.

    • Pankaja Munde Join Shiv Sena : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि सुनिल शिंदेंनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुली ऑफर दिली आहे.

Devendra Fadnavis On Pankaja Munde : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार सुनिल शिंदे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळं आता पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला जात असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्याचं स्वागत केलं जाईल, असं वक्तव्य ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांनी केलं आहे. त्यामुळं आता मुंडेंच्या पक्षांतराची चर्चा होत असतानाच त्यावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

पंकजा मुंडेंसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असले तरी त्या भाजपमध्येच राहणार असून त्या कुठेही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हे पंकजा मुंडेंचं घर असून शिवसेनेच्या नेत्यांनी कितीही वक्तव्ये केली तरी ते राजकीय स्टेटमेंट राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय पंकजा मुंडे पक्षांतर करणार नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळं पंकजा मुंडेच्या पक्षांतरांच्या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. याबाबात पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळंच भाजप मराठवाड्यासह महाराष्ट्रात परसली. परंतु आता त्यांच्याच मुलीवर भाजपमध्ये अन्याय केला जात आहे. पंकजा मुंडेंसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला हवा, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. याशिवाय शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनीदेखील पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती. परंतु आता मुंडेंच्या पक्षांतराच्या वृत्ताचं खुद्द फडणवीस आणि बावनकुळेंनी खंडन केल्यानंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेणार, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.