मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde On PM Modi: मोदीही मला संपवू शकणार नाहीत; पंकजा मुंडेंनी केला खुलासा

Pankaja Munde On PM Modi: मोदीही मला संपवू शकणार नाहीत; पंकजा मुंडेंनी केला खुलासा

Sep 28, 2022, 01:33 PM IST

    • Pankaja Munde On PM Modi: पंतप्रधान मोदींना वंशवाद संपवायचाय, मीसुद्धा वंशवादाचे प्रतिक पण ते मला संपवू शकत नाहीत या वक्तव्यावर आता पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Pankaja Munde On PM Modi: पंतप्रधान मोदींना वंशवाद संपवायचाय, मीसुद्धा वंशवादाचे प्रतिक पण ते मला संपवू शकत नाहीत या वक्तव्यावर आता पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

    • Pankaja Munde On PM Modi: पंतप्रधान मोदींना वंशवाद संपवायचाय, मीसुद्धा वंशवादाचे प्रतिक पण ते मला संपवू शकत नाहीत या वक्तव्यावर आता पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

Pankaja Munde On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यातील एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. बीडमध्ये अंबाजोगाई इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मीसुद्धा वंशवादाचं प्रतिक आहे पण मोदीही मला संपवू शकत नाहीत. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले. मात्र आता यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं की," माझ्या भाषणातली केवळ एकच ओळ आपल्यापर्यंत आली."

ट्रेंडिंग न्यूज

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर म्हटलं की,"मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाच्या हायलाइट्स. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा. मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंकवर आहेच.धन्यवाद." या ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लहानपणाच्या काही गोष्टींचा उल्लेख केला होता. यातून नरेंद्र मोदींना करावा लागलेला संघर्ष त्यांनी सांगितला होता. त्यांनी म्हटलं होतं की, काही मुलांच्या नशिबात त्यांच्या आवडीच्या गोष्टी मिळतात. पण काही मुलांच्या नशिबात हे नव्हतं. मी त्यांच्या सायकॉलॉजीचा विचार करते. असाच एक मुलगा पंतप्रधान म्हणून मिळाला. ज्याला गणवेश घ्यायला, शाळेत जायला पैसे नव्हते. वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. आई चुलीसमोर धुराड्यात स्वयंपाक करत होती. ते देशाचे पंतप्रधान बनले असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

महत्त्वकांक्षा हा शब्द मला आवडत नाही. पण मोठी दिव्य स्वप्न बघायला हरकत नाही. त्यात कमी जास्त होतं पण आपण तिथे पोहोचतोच. जगाची महासत्ता करण्याचं स्वप्न आहे. पहिल्यांदा आमदार झाले, मुख्यमंत्री झाले. खासदार झाले आणि पंतप्रधान झाले. नंतर पंतप्रधान झाले ते ऐतिहासिक बहुमत घेऊन आले. खूप बुद्धीवान असण्याची गरज नाही सातत्य आणि कष्ट, सकारात्मकता असणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदींसारखा पंतप्रधान लाभलाय, जगात एक वेगळं वलय निर्माण झालंय भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मोदींचे कौतुक केले होते.

आपण ही निवडणूक लढताना काही बदल करू, टिपिकल निवडणूक न लढता वेगळ्या पद्धतीने लढू. मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचंय. वंशवाद म्हणजे मी पण वंशवादाचं प्रतिक आहे. पण मला संपवू नाही शकत नाही. मोदीजींनी जरी ठरवलं तरी ते मला संपवू शकणार नाही जर मी तुमच्या मनात राज्य केलं तर, तुमच्या जीवनात मी चांगलं करु शकले तर ते शक्य नाही. आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे, राजकारणातून चांगले , महत्त्वाचे निर्णय होता. या मुलांना चांगले भविष्य दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील असेही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.