मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : मुंबईला डान्सबारची उपमा; उपरोधिक टीकेमुळं राज ठाकरे वादात

Raj Thackeray : मुंबईला डान्सबारची उपमा; उपरोधिक टीकेमुळं राज ठाकरे वादात

Jan 25, 2023, 06:33 PM IST

  • NCP on Raj Thackeray comment on Mumbai : मुंबई शहराला उपरोधानं डान्सबारची उपमा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं सडकून टीका केली आहे.

Raj Thackeray

NCP on Raj Thackeray comment on Mumbai : मुंबई शहराला उपरोधानं डान्सबारची उपमा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं सडकून टीका केली आहे.

  • NCP on Raj Thackeray comment on Mumbai : मुंबई शहराला उपरोधानं डान्सबारची उपमा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं सडकून टीका केली आहे.

NCP Slams Raj Thackeray : मुंबईला डान्सबारची उपमा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे टीकेच्या रडारवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. 'मुंबईला डान्सबार असं संबोधून राज ठाकरे यांनी मुंबईकरांचा अपमान केला आहे. त्यांनी समस्त मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबईतील सुशोभीकरणाच्या संदर्भात भाष्य केलं होतं. सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईत काय केलंय हेच कळत नाही. मुंबईतील खांबावर ज्या पद्धतीचे लाईट लावले आहेत, ते पाहता रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार हेच कळत नाही, असं राज ठाकरे उपरोधानं म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

'मुंबईत विद्युत खांबावर लावण्यात आलेली रोषणाई राज ठाकरे यांना डान्सबारसारखी दिसत असेल तर ही शोकांतिका आहे. मुंबईकरांचा अपमान करणार्‍या राज ठाकरे यांनी जनतेची व मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली. 'मुंबई डान्सबारसारखी दिसते असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना बेस्टनं १८ टक्के वीज दरवाढीसाठी दिलेला प्रस्ताव दिसत नाही किंवा ते त्यावर बोलत नाहीत. त्यावर बोलले असते तर नक्कीच आनंद झाला असता, असं तपासे म्हणाले.

फडणवीसांचा आरोप हास्यास्पद

महाविकास आघाडीनं मला तुरुंगात टाकण्याचा कट केला होता व मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ते टार्गेट दिलं होतं, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याची महेश तपासे यांनी यावेळी खिल्ली उडवली. 'फडणवीसांचा हा आरोप हास्यास्पद आहे. मुळात भाजपनं देशपातळीवरच्या व राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी, सीबीआय या यंत्रणांचा दुरुपयोग करून जेलमध्ये टाकण्याचा सपाटा लावला आहे. भाजपनं ईडी या यंत्रणेचा इतका दुरुपयोग केला की काल झवेरी बाजारमध्ये ईडीच्या तोतया अधिकार्‍यांनी धाड टाकल्याचं समोर आलं. म्हणजे देशाची नामांकित संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा