मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik MLC Election : पक्षाचा पाठिंबा नसतानाही भाजप आमदार सत्यजीत तांबेंच्या प्रचारात

Nashik MLC Election : पक्षाचा पाठिंबा नसतानाही भाजप आमदार सत्यजीत तांबेंच्या प्रचारात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 25, 2023 01:15 PM IST

Nashik Graduate Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपनं अद्यापही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिलेला नाही. परंतु आता भाजपचे आमदार मात्र सत्यजीत तांबेंचा प्रचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Graduate Constituency Election
Nashik Graduate Constituency Election (HT)

Nashik Graduate Constituency Election : काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी करत नाशिक पदवीधरची निवडणूक लढवणाऱ्या सत्यजीत तांबे यांना भाजपनं अद्याप पाठिंबा दिलेला नसला तरी आता भाजप आमदार मात्र दणक्यात त्यांचा प्रचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. धुळ्यातील शिरपुरमध्ये भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी सत्यजीत तांबेंच्या प्रचारासाठी मेळावा घेऊन तांबेंना मतदान करण्याचं आवाहन पदवीधरांना केलं आहे. त्यामुळं आता भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा जाहीर केलेला नसतानाही आमदार पटेल यांनी सत्यजीत तांबेंचा प्रचार केल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपनं अद्याप उमेदवार उभा केलेला नाही अथवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. असं असतानाही भाजपा आमदार अमरिश पटेल यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेत मात्र सत्यजीत तांबेंच्या प्रचारासाठी मेळावा घेतला आहे. यावेळी भाजप नेते तुषार रंधे यांच्यासह मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी भाजप आमदारासह पक्षाच्या नेत्यांनी सत्यजीत तांबेंना विजयी करण्याचं आवाहन पदवीधरांना केलं आहे. माजी आमदार सुधीर तांबे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळं आता सत्यजीत तांबे यांनी नेहमीच केलेल्या सहकार्यामुळं त्यांचा प्रचार करत असल्याचं आमदार अमरिश पटेल यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीनं सत्यजीत तांबे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसनं नाशिकची जागा शिवसेनेला सोडून नागपुरची जागा घेतली आहे. त्यामुळं आता नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंना मोठं आव्हान उभं राहिलेलं असतानाच भाजपा आमदार अमरिश पटेल यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं आता याची राज्यभर चर्चा होत आहे.

IPL_Entry_Point