मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदाराची पोलिसांशी अरेरावी; फडणवीसांच्या बैठकीवेळी जोरदार राडा
Ramesh Bornare vs Police In Aurangabad
Ramesh Bornare vs Police In Aurangabad (HT)

Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदाराची पोलिसांशी अरेरावी; फडणवीसांच्या बैठकीवेळी जोरदार राडा

25 January 2023, 18:38 ISTAtik Sikandar Shaikh

Ramesh Bornare Vaijapur : गाडी आत का जाऊ दिली नाही?, असा सवाल करत शिंदे गटाच्या आमदारानं थेट पोलिसांसोबत हुज्जत घातल्याची घटना समोर आली आहे.

Ramesh Bornare vs Police In Aurangabad : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीसाठी निघालेल्या वाहनाच्या ताफ्याला पोलिसांनी अडवल्यानंतर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी पोलिसांनी अरेरावी करत हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस औरंगाबादेतील विभागीय आयुक्तालयात आले असता त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारात आणि पोलिसांत राडा झाल्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. बोरनारेंची गाडी अडवल्यामुळं ड्रायव्हर आणि पोलिसांत वादावादी झाली, प्रकरण चिघळल्यानंतर गाडीतून खाली उतरत आमदार रमेश बोरनारे यांनी पोलिसांना अरेरावी केली आहे. या राड्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदांच्या गाड्या आत जाऊ दिल्या, परंतु माझी गाडी का नाही जाऊ दिली?, असा सवाल करत शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यामुळं विभागीय आयुक्तालय परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत प्रकरण मिटवलं. त्यामुळं आता काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्यामुळं चर्चेत आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंनी पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळं आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत रमेश बोरनारे?

रमेश बोरनारे हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर पक्षातील बंडावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांना ठाकरे गटाकडून महालगावात विरोध करण्यात आला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि बोरनारे समर्थक आमने-सामने आले होते. रमेश बोरनारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील विश्वासू आमदार समजले जातात.