मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Crop Insurance :" ..त्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना दारात उभे करणार नाहीत" - जयंत पाटील

Crop Insurance :" ..त्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना दारात उभे करणार नाहीत" - जयंत पाटील

Mar 20, 2023, 06:45 PM IST

  • Jayant patil  : नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी,  अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील

Jayantpatil : नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

  • Jayant patil  : नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी,  अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

सरकार शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे, असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात सरकारकडून हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लुबाडणूक सुरू आहे. देवस्थानांच्याजमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदूदेवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच जयंत पाटील यांनी पुराव्यांसह सभागृहात सादर केली. या घोटाळ्यामागे कुठेल अधिकारी आहेत, राजकीय नेते आहेत तसेच अन्य कोणाला याचा लाभ मिळाला याचा तपास मंत्रिमहोदयांनी करावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

सभागृहात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नियुक्त करून'दूध का दूध, पानी का पानी' करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना रहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे रहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी.

नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.