मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर अत्याचार; लग्नास नकार देताच अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर अत्याचार; लग्नास नकार देताच अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

Mar 20, 2023, 04:10 PM IST

  • Nashik: नाशिक शहराच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नास नकार देणाऱ्या विवाहित महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात धमकी देण्यात आली.

Rape

Nashik: नाशिक शहराच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नास नकार देणाऱ्या विवाहित महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात धमकी देण्यात आली.

  • Nashik: नाशिक शहराच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नास नकार देणाऱ्या विवाहित महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात धमकी देण्यात आली.

Nashik Crime: महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असताना नाशिक येथील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत. विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढवून तिच्यावर अत्याचार केले. मात्र, या महिलेने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

मनोज यशवंत जगताप असे संशयित आरोपी व्यक्तीचे नाव आहे. मनोज आणि पीडित महिला नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करतात. दरम्यान, दोघांमध्ये काही दिवसानंतर मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीची रपांतर प्रेमात झाले. मनोजच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने पीडिताला निमंत्रित केले. त्यानंतर घरी कुणीही नसल्याचे पाहून पीडिताला तिच्या घरी नेले. मात्र, त्यापूर्वीच वाटेत त्याने पीडिताला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिचे अश्लील फोटो काढले.

दरम्यान, काही दिवसांनी आरोपीने पीडिताला लग्नाची मागणी घातली. मात्र, पीडिताने माझे लग्न झाले असून तिला दोन मुले असल्याचे सांगत नग्नाला नकार दिला. मात्र, त्यानंतरही आरोपीने पीडितावर लग्नासाठी दबाव आणला. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर संतापलेल्या आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हे ऐकल्यानंतर पीडिताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने त्वरीत मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा