मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : प्रेमाचं नाटक करून तरुणीनं ५ लाख रुपये लुटले! नैराश्य आलेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime : प्रेमाचं नाटक करून तरुणीनं ५ लाख रुपये लुटले! नैराश्य आलेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 20, 2023 03:25 PM IST

Pune Crime : पुण्यात एका तरुणीने एका तरूणाशी प्रेमाचे नाटक करून त्याला तब्बल ५ लाख रुपयांनी लुबाडले. एवढेच नाही तर ब्लॅकमेलदेखील ती करू लागल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

Crime
Crime

पुणे: पुण्यात एका तरुणीने एका तरूणाशी प्रेमाचे नाटक करून त्याच्या कडून सोन्याच्या दागिन्यासह त्याला तब्बल ५ लाख रुपयांनी लुबाडले. एवढेच नाही त्याचे आणि तिचे फोटो समाज मध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिचा त्रास असह्य झाल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज मल्हारी सोनवणे (वय ३१, रा. टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्योती गिरी, गौरी गिरी, राजेंद्र गिरी आणि नाना जगदाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या प्रकरणी तरुणाच्या पत्नीने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ज्योति गिरी हिने युवराज सोनवणे याच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्याला तिच्या जाळ्यात ओढत त्याच्याकडून वारंवार पैसे घेत पाच लाख रुपये उकळले. एवढेच नाही तर सोन्याचे दागिने देखील त्याच्या कडून घेतले. दरम्यान, तिने तिचे आणि त्याचे काही आक्षेपार्ह फोटो काढत ते फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी तिने त्याला देत आणखी पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार देतो अशी धमकी देखील दिली. या सर्व प्रकाराला युवराज घाबरला होता. दोन दिवसांपूर्वी तो टिटवाळ्याहून पुण्यात आला. त्याने आरोपी ज्योती गिरी राहत असलेल्या खडकी परिसरातील रेंजहिल्स भागातील सोसायटीत जात युवराजने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेत आपले जीवन संपवले.

युवराजने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ती पोलिसांना सापडली असून आत्महत्येचे खरे कारण पुढे आले. या प्रकरणी युवराज च्या पत्नीने फिर्याद दिल्यावर चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग