मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narhari Zirwal in Nashik : नॉट रिचेबल झाल्याची चर्चा असलेले नरहरी झिरवळ मिसळ खाताना दिसले!

Narhari Zirwal in Nashik : नॉट रिचेबल झाल्याची चर्चा असलेले नरहरी झिरवळ मिसळ खाताना दिसले!

May 11, 2023, 11:48 AM IST

  • Narhari Zirwal spotted in Nashik : राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नाशिकमध्ये मिसळ खाताना दिसले आहेत.

Narhari Zirwal

Narhari Zirwal spotted in Nashik : राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नाशिकमध्ये मिसळ खाताना दिसले आहेत.

  • Narhari Zirwal spotted in Nashik : राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नाशिकमध्ये मिसळ खाताना दिसले आहेत.

Narhari Zirwal spotted in Nashik : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नॉट रिचेबल झाल्याची चर्चा असलेले विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्वत: ही चर्चा फेटाळून लावली आहे. कार्यकर्त्यांसोबत मिसळ खातानाचा त्यांचा फोटो समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

नरहरी झिरवळ आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचं वृत्त पसरलं होतं. ते स्वत:च्या गावीही नसल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यातच खासदार संजय राऊत यांनी झिरवळ यांचा उल्लेख असलेलं एक ट्वीट केलं. त्यामुळं गूढ अधिकच वाढलं होतं. मात्र, आता झिरवळ यांनी स्वत:च आपला ठावठिकाणा सांगितला आहे.

Pradeep Kurulkar : कुरुलकरांच्या जागी अब्दुल, हुसेन किंवा शेख हे शास्त्रज्ञ असते तर…; शिवसेनेचा भाजप-संघावर हल्लाबोल

'मी कुठेही गेलेलो नाही किंवा नॉट रिचेबल नाही. मी नाशिकमध्येच आहे. नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या एका इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं मी आज इथंच असणार आहे, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. झिरवळ हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मिसळ खात असल्याचा एक फोटोही समोर आला आहे.

संजय राऊत यांचं सूचक ट्वीट

संजय राऊत यांनी झिरवळ यांच्या नावाचा उल्लेख करून एक ट्वीट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनंच लागेल आणि बंडखोरांना पुन्हा झिरवळ यांच्याकडं जावं लागेल, असा त्या ट्वीटचा अर्थ सांगितला जात आहे. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ… जय महाराष्ट्र!’… असं ते ट्वीट आहे. त्यामुळं झिरवळ अधिकच चर्चेत आले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा