मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut On SC Verdict : भाजप की शिंदे गट, कोणतं सरकार पडेल?, राऊतांचा अजित पवारांना खोचक सवाल

Sanjay Raut On SC Verdict : भाजप की शिंदे गट, कोणतं सरकार पडेल?, राऊतांचा अजित पवारांना खोचक सवाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 11, 2023 10:37 AM IST

Sanjay Raut On Maharashtra Political Crisis : बहुमत असेल तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला होता.

Sanjay Raut On Maharashtra Political Crisis
Sanjay Raut On Maharashtra Political Crisis (HT)

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis Today Live : राज्यातील सत्तासंघर्षावरील प्रकरणांवर सुप्रीम कोर्टातून थोड्याच वेळात निकाल येणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरही कोर्ट आज निकाल देणार आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. बहुमत असेल तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. सरकारला कोणताही धोका नाही असं कोण कसं बोलू शकतं?, भाजपचं सरकार की शिंदे गटाचं सरकार पडेल, हे अजित पवारांनी सांगायला हवं, असा सवाल करत राऊतांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहे. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल, ते अपात्र ठरतील आणि त्यानंतर गद्दारांचा गट संपून जाईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन करणार आहे. प्रकरणातील पाच न्यायाधीशांचं निकालावर एकमत झालं आहे. सरन्यायाधीशांशिवाय अन्य न्यायाधीश निकालाबाबत बोलणार नाहीत. त्यामुळं आता राज्यातील सत्तासंघर्ष आणि आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point