मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Metro Wristband : मेट्रो प्रवाशांना आता तिकीट काढण्याची गरज नाही; टॅपटॅप रिस्टबँड आहे ना! काय आहे नवी सिस्टिम?

Metro Wristband : मेट्रो प्रवाशांना आता तिकीट काढण्याची गरज नाही; टॅपटॅप रिस्टबँड आहे ना! काय आहे नवी सिस्टिम?

Apr 11, 2024, 01:16 PM IST

  • Mumbai Metro launches TapTap wristband: मेट्रो १ च्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रोने टॅपटॅप रिस्टबँड तिकीट प्रणाली आणली आहे.

प्रवाशांचा प्रवास आणखी सोयिस्कर करण्यासाठी मुंबई मेट्रोने टॅपटॅप रिस्टबँड लॉन्च केले आहे.

Mumbai Metro launches TapTap wristband: मेट्रो १ च्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रोने टॅपटॅप रिस्टबँड तिकीट प्रणाली आणली आहे.

  • Mumbai Metro launches TapTap wristband: मेट्रो १ च्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रोने टॅपटॅप रिस्टबँड तिकीट प्रणाली आणली आहे.

Mumbai Metro: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ चा (Versova-Andheri-Ghatkopar Metro 1) वापर करणाऱ्या ४ लाख प्रवाशांना लवकरच तिकिटाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. निवडणुकीच्या काळात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (Mumbai Metro) नवीन प्रकारच्या तिकीट प्रणालीचे उद्घाटन केले आहे. आता फक्त क्यूआर-कोडेड रिस्टबँड (TapTap wristband) (मनगटी बँड) स्कॅन करून मेट्रो १ मधून प्रवास करता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

मुंबईत मद्यधुंद तीन तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

Weather Updates: विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आज अवकाळी पावसाची शक्यता, मुंबई आणि कोकणात उष्णता कायम

मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज भासणार नाही. मुंबई मेट्रो १ ने बुधवारी (१० एप्रिल)नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबँड सादर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल. टॅपटॅप रिस्टबँड स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे.

varandha ghat : वरंधा घाट 'या' कारणासाठी ३० मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टॅपटॅप रिस्टबँड किंमत किती असेल?

अधिकाऱ्यांचा दावा आहे की, टॅपटॅप बॅटरीशिवाय कार्य करेल, वापरकर्त्यांना आवश्यकतेनुसार पैसे लोड करण्याची परवानगी देईल, टॅपटॅप रिस्टबँड वॉटरप्रूफ असेल. तसेच हे नॉन-एलर्जीक असेल, ज्याची किंमत २०० रुपये असेल, अशी माहिती मेट्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

टॅपटॅप रिस्टबँडची खरेदी कुठून करायची?

मेट्रो १ च्या सर्व स्थानकावरून टॅपटॅप रिस्टबँडची खरेदी करता येणार आहे. हे बँड घड्याळाप्रमाणेच आहे.मेट्रोतून प्रवास करताना हा बँड स्कॅन करून आता प्रवास करता येणार आहे. टॉकअप करण्याची सुविधा असणार आहे.

Road Accident : दुचाकीला धडकून हवेत उडाली कार; ५ जणांचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पुणे मेट्रोने टॅप अँड गो प्रणाली

प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने टॅप अँड गो ही प्रणाली सुरू केली. वन पुणे कार्ड संपर्करहित तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि सुरळीत व्यवहार प्रक्रियेची हमी देते. वन पुणे कार्ड वापरून प्रवासी सोयीस्करपणे मेट्रो तिकिटांसाठी पैसे देऊ शकतात. कार्डचा वापर ऑनलाइन आणि स्टोअरमध्ये अशा दोन्ही प्रकारच्या किरकोळ खरेदीसाठी केला जाऊ शकतो. हे कार्ड मिळवण्यासाठीप्रवाशी मेट्रो स्टेशनला किंवा https://t.co/8zQXg7IRkx या लिंकवर भेट देऊ शकतात.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा