मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalbaug Crime : लालबाग हादरले! घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह

Lalbaug Crime : लालबाग हादरले! घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह

Mar 15, 2023, 11:17 AM IST

  • Lalbaug dead body News : लालबाग येथील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेच्या मृतदेह आढळला. भयंकर बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळला आहे.

Lalbhaug murde

Lalbaug dead body News : लालबाग येथील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेच्या मृतदेह आढळला. भयंकर बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळला आहे.

  • Lalbaug dead body News : लालबाग येथील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेच्या मृतदेह आढळला. भयंकर बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळला आहे.

Lalbaug Dead body Case : मुंबईच्या लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा  मृतदेह हा एका प्लॅस्टिक बॅगेत बांधून कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. मृत महिलेचे वय साधारणत: ५० ते ५५ असून ती तिच्या मुलीकडे राहत असल्याची माहिती प्राथमिक तपासात आढळली आहे. मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची परेड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

मुंबईच्या लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घराची झडती घेतली असता त्यांना घरातील कपाटात माहीलेचे शव आढळले. या महिलेचे शव एका प्लॅस्टिक बॅगेत बांधण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. उत्तरीय तपासणीसाठी तो पाठवण्यात आला आहे.

या बाबत परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असून ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री काळाचौकी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले.

त्यावेळी घरात शोध घेतला असता एका कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतण्यात आले आहे. पोलिस तिची चौकशी केली जात आहे. महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर कळणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा