Pakistan news: पाकिस्तानात राडा! इम्रान खान समर्थक आणि पोलिसांमध्ये हाणामारी, तुफान दगडफेक
Pakistan news: महिला न्यायाधीश आणि एका पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपा खाली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
इस्लामाबाद : महिला न्यायाधीश आणि एका पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपा खाली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, खान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि खान समर्थकांमद्धे तुंबळ हाणामारी झाली. मोठ्या प्रमाणात दगड फेक करण्यात आल्याने अनेक पोलिस आणि सामान्य नागरिक जखमी झाले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुदुराच्या कांड्या आणि लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान, या घटनेला इम्रान खान यांनी लंडन प्लॅन म्हटले आहे. या दगडफेकीत इस्लामाबादचे पोलिस महासंचालक आणि अनेक पोलिस ही गंभीर जखमी झाले.
ट्रेंडिंग न्यूज
या प्रकरणी इम्रान खान यांनी ट्विट केले आहे. त्यांनी व्हिडिओ क्लिप टाकली असून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. खान म्हणाले, ज्या पद्धतीने पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले ते चुकीचे आहे. अशा पद्धतीची ही पहिली घटना आहे. पोलिसांनी लाठीचार्ज का केला यात काही कारण दिसत नाही. त्यांनी जाणून बुजून लाठीचार्ज केला. मला १८ तारखेला जमानत होती. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे मी जमानत घेण्यासाठी जात नसल्याची माहिती देखील पोलिसांना होती. मला अटक करण्याची पुन्हा तयारी केली जात आहे. मी लाहोर न्यायालयाला सांगितले आहे की मी १८ मार्च ला न्यायालयात उपस्थित राहणार. परंतु माझे म्हणणे कुणी ऐकले नाही.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने एका महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर इम्रान खान यांना अटक करून २९ मार्च आधी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
२० ऑगस्ट रोजी एफ-९ पार्कमधील एका रॅलीत न्यायदंडाधिकारी झेबा चौधरी आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी तीन पानांचा निकाल जाहीर करत तसेच या प्रकरणी इम्रान खान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांनी सुनावणीला हजर राहण्याऐवजी न्यायाधीशांसमोर हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे न्यायालयात उपस्थित राहण्या संदर्भात त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिस एका विशेष हेलिकॉप्टरने त्याच्या लाहोर येथील निवासस्थानी पोहचले. मात्र, यावेळी पोलिसांना चुकवत खान हे आपल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले होते. इम्रान खान यांची गेल्या एप्रिलमध्ये पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. इस्लामाबाद आणि लाहोरच्या पोलीस अधिकार्यांमध्ये झालेल्या बैठकीत त्यांना अटक करण्याचे ठरले. खान यांना अटक करण्यासाठी पोलिस दुसऱ्यांदा लाहोरमध्ये आले आले होते.
हा तर लंडन प्लॅनचा भाग
मला अटक करण्याचा हा लंडन प्लॅन आहे. या अंतर्गरत नवाज शरीफ यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेणे अशी भूमिका आहे. त्यामुळेच माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात असल्याचा गंभीर आरोप इम्रान खान यांनी लावला आहे.
विभाग