मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांच्या ऑफिसचं दिल्लीत होणार स्थलांतर; केंद्रातील मोदी सरकारचे निर्देश

मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांच्या ऑफिसचं दिल्लीत होणार स्थलांतर; केंद्रातील मोदी सरकारचे निर्देश

Mar 21, 2023, 03:42 PM IST

  • Textile Office Mumbai : केंद्रातील मोदी सरकारनं टेक्सटाईल आयुक्तांचं ऑफिस मुंबईतून दिल्लीत हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Textile Office Mumbai Updates (HT)

Textile Office Mumbai : केंद्रातील मोदी सरकारनं टेक्सटाईल आयुक्तांचं ऑफिस मुंबईतून दिल्लीत हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

  • Textile Office Mumbai : केंद्रातील मोदी सरकारनं टेक्सटाईल आयुक्तांचं ऑफिस मुंबईतून दिल्लीत हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Textile Office Mumbai Updates : महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय राजधानी दिल्लीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं वस्त्रोद्योग आयुक्तांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळं आता यावरून राज्यात राजकीय वादंग पेटलं असून महाविकास आघाडीनं यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच केंद्रानं हा निर्णय घेतल्यामुळं भाजप आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सटाईल विभागाचं आणि विभागाच्या आयुक्तांचं मुख्य कार्यालय मुंबईत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे कार्यालय दिल्लीत हलवण्यासाठी हालचाली सुरू होत्या. अखेरीस मोदी सरकारनं हे कार्यालय दिल्लीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एअर इंडिया आणि वित्तीय केंद्राचं कार्यालय मुंबईतून अन्य राज्यांमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एक कार्यालय राज्याबाहेर गेल्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाबाबत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. परंतु कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील तळेगावात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला होता. याशिवाय बल्कड्रग आणि नागपुरमधील जेट-एअरबस प्रकल्पही अन्य राज्यात हलवण्यात आला होता. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं.