मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छत्रपती संभाजी महाराज व औरंगाबाद याचा काय संबंध? इम्तियाज जलील यांचा सवाल, सुचवले नवे नाव

छत्रपती संभाजी महाराज व औरंगाबाद याचा काय संबंध? इम्तियाज जलील यांचा सवाल, सुचवले नवे नाव

Feb 28, 2023, 09:20 PM IST

  • Mim mp Imtiaz jalil : खासदार जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद शहराच्या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे.

इम्तियाज जलील

MimmpImtiazjalil : खासदार जलील यांनीआजपत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद शहराच्या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे.

  • Mim mp Imtiaz jalil : खासदार जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद शहराच्या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे.

औरंगाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिल्याने याच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या ताज्या वक्तव्याने यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खासदार जलील यांनी औरंगाबाद व छत्रपती संभाजी महाराज यांचा काय संबंध असा सवाल उपस्थित करत या शहरासाठी नवीन नाव सुचवलं आहे. त्याचबरोबर खासदार जलील यांनी नामांतराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

खासदार जलील यांनीआजपत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद शहराच्या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे.

इम्तियाज जलिल यांनी म्हटलं की, मलिक अंबर यांच्या नावावरून औरंगाबादचे नाव अंबराबाद करा. नामांतराचे राजकारण बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलं व यावरून त्यांनी३०वर्षे घाणेरडं राजकारण केल्याचा आरोपही जलील यांनी केला.

जलील म्हणाले की,मीसर्वजाती-धर्माचा खासदार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय सबंध आहे कुणी सांगावे.मग त्यावरून या शहराचे नाव का बदलणार. शहरांच्या नावाला तसा काहीही अर्थ नाही.तसे असेल तरकोल्हापूरच नाव छत्रपती शाहू नगर करा,पुण्याचे नावफुले नगर अथवा फुले करा,नागपूरचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरकरा कारण तिथंदीक्षाभूमी आहे. मुंबई या नावालाहीतसा अर्थ नाही मग याचे नामांतर छत्रपती शिवाजीमहाराजनगर असं करा.मालेगावला मौलाना आबाद नाव करा असे खासदार जलील यांनी सुचवले.

जलील म्हणाले की, बिहारमध्येही एक औरंगाबाद आहे. तिथं भाजपचे खासदार आहे. मग ते औरंगाबाद भाजपला चालते का? असा सवाल केला.तुम्हाला औरंगाबाद नको म्हणून तुम्ही महापुरुषांच्या नावात बदल केला. आता या शहरांचाही करुन घ्या. जी२० परिषदेसाठीशहर सजवले मात्र २ दिवस सजवून याने काय साध्य होणार. शहराच्या नामांतराला माझा विरोध कायम आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा