मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठं यश, सरकारकडून प्रलंबित मागण्या मान्य

Anganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठं यश, सरकारकडून प्रलंबित मागण्या मान्य

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 28, 2023 06:13 PM IST

Anganwadi workers protest : राज्यातीलअंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली असूनअंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मुंबईतील आझाद मैदानावर व रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला मोठं यश आले असून अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली असून अंगणवाडी सेविकांच्या काही प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्याच्या आदेशाने तातडीची  बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.

सरकारने अंगणवाडी सेविकांसोबत झालेल्या बैठकीनंतर जाहीर केले की, राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना  स्मार्ट फोन दिले जाणार आहेत.  

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. अखेर या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तर काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे सांगितले होते. या सेविकांच्या मानधनात राज्य सरकारनं  गेल्या साडे पाच वर्षात तर केंद्र सरकारने साडे चार वर्षापासून कोणतीही वाढ केली नव्हती. यामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. हा प्रश्न विधानसभेतही चर्चेस आला होता. 

IPL_Entry_Point