मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Mega block : सेंट्रल, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा!

Mumbai Railway Mega block : सेंट्रल, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा!

Feb 24, 2023, 07:29 PM IST

  • Mumbai Railway Mega block on 26 February : मुंबईत रविवार, २६ फेब्रुवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mega block (Azad Shrivastav)

Mumbai Railway Mega block on 26 February : मुंबईत रविवार, २६ फेब्रुवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

  • Mumbai Railway Mega block on 26 February : मुंबईत रविवार, २६ फेब्रुवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mumabi Railway Megablock on 26 February 2023 : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं येत्या रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेतला आहे. या काळात मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहील.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

असा असेल ब्लॉक

माटुंगा ते मुलुंड स्लो लाइनवर सकाळी ११ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत स्लो ट्रॅकवरून सुटणाऱ्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढं मुलुंड स्थानकावर पुन्हा स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटं उशिरानं निश्चित स्थानकात पोहोचतील.
  • ठाण्याहून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत स्लो ट्रॅकवरून सुटणाऱ्या लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढं पुन्हा स्लो ट्रॅकवर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकात पोहोचतील.

Churchgate Renaming : चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यास विरोध का? वाचा!

पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत 

  • पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल बंद राहतील.
  • पनवेलहून ठाण्यासाठी सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेच्या दरम्यान सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल आणि ठाण्याहून पनवेलसाठी सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेच्या दरम्यान सुटणाऱ्या लोकल गाड्या बंद राहतील.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. 
  • ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असतील.
  • बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

मुंबईतील नायर रुग्णालयात भयानक घटना; सातव्या मजल्यावरून कोसळला २८ वर्षीय रुग्ण

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा