मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील नायर रुग्णालयात भयानक घटना; सातव्या मजल्यावरून कोसळला २८ वर्षीय रुग्ण

मुंबईतील नायर रुग्णालयात भयानक घटना; सातव्या मजल्यावरून कोसळला २८ वर्षीय रुग्ण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 24, 2023 10:32 AM IST

Patient falls in Nair hospital : मुंबईतील नायर रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरून एक रुग्ण खाली कोसळल्याची घटना घडली आहे.

Nair Hospital
Nair Hospital

Nair Hospital mishap : मुंबईतील नायर रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरून एक २८ वर्षीय रुग्ण पडल्याचं समजतं. गुरुवारी रात्री ही घटना घडली. थेट तळमजल्यावर पडलेल्या या रुग्णालयाला मोठी दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सतीश कुमार असं या तरुण रुग्णाचं नाव आहे. तो नालासोपाराचा रहिवासी असून २१ फेब्रुवारीपासून नायर रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर तो उपचार घेत आहे. तो चुकून वरून खाली पडला की त्यानं उडी मारली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खाली पडताना तो काही मजल्यांच्या एसी डक्टवर आदळल्यानं त्याला दुखापत झाली आहे. ही घटना कशी घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेत असलेला सतीश कुमार सातव्या मजल्यावर कशासाठी गेला होता. तो मानसिक तणावात होता की काय, याचाही तपास पोलीस करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग