मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Online टॉवेल खरेदी करणे पडले महागात; १ टाॅवेल १ लाखात पडला, वृद्ध महिलेची सहा लाखांची फसवणूक

Online टॉवेल खरेदी करणे पडले महागात; १ टाॅवेल १ लाखात पडला, वृद्ध महिलेची सहा लाखांची फसवणूक

Mar 29, 2023, 01:15 PM IST

  • mumbai cyber crime : मुंबईत मीरा रोड येथे राहणाऱ्या एका महिलेला ऑनलाइन टॉवेल खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. तिची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Cyber Frauds

mumbai cyber crime : मुंबईत मीरा रोड येथे राहणाऱ्या एका महिलेला ऑनलाइन टॉवेल खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. तिची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • mumbai cyber crime : मुंबईत मीरा रोड येथे राहणाऱ्या एका महिलेला ऑनलाइन टॉवेल खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. तिची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

मुंबई : मीरा रोड येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची सायबर चोरट्यांनी तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक केली. या महिलेने ऑनलाइन टॉवेल मागवला होता. मात्र, हा टॉवेल या महिलेला तब्बल ६ लाख रुपयांचा पडला आहे. या याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी सायबर क्राइम अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेने तब्बल १ हजार १६९ रुपये किमतीचे सहा टॉवेल खरेदी केले होते. त्याचे पैसे वॉलेट अॅपद्वारे त्यांनी केले. त्यांनी यासाठी चुकून जास्तीचे १९ हजार ५ रुपये पेड केले.

जास्तीचे झालेले पेमेंट कसे परत मिळवायचे यासाठी या महिलेने बँकेशी संपर्क साधला. मात्र, घरी आल्यावर या महिलेला एका व्यक्तीचा फोन आला. त्याने तो बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. यावेळीत याने महिलेला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार महिलेने अप डाऊनलोड केले. मात्र, हे ते डाऊनलोड करताच महिलेच्या खात्यातून काही वेळातच एक लाखाहून अधिक रक्कम सहा वेळा काढण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे पैसे उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील अंबारी गावातील एका खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा