मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tata Memorial Hospital : टीएमएच तर्फे बाहेरगावाहून मुंबईत येणारया कॅंसर रुग्णांना राहण्यासाठी १०० फ्लॅटचे हॉस्टेल

Tata Memorial Hospital : टीएमएच तर्फे बाहेरगावाहून मुंबईत येणारया कॅंसर रुग्णांना राहण्यासाठी १०० फ्लॅटचे हॉस्टेल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 29, 2023 11:33 AM IST

Tata Memorial Hospital hostel : टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कर्करोगावरील उपचारासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. दवाखाना परिसरात त्यांना राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांना बाहेर राहावे लागत असे. रुग्णांची होणारी अडचण पाहता आता त्यांच्यासाठी १०० फ्लॅटचे वसतिगृह रुग्णालयाने तयार केले आहे.

mumbai
mumbai

मुंबई: कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशभरातून हजारो रुग्ण कर्करोगावरील उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांना राहण्याची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. त्यांची ही अडचण बघता भोईवाडा येथील कर्करोग केंद्राजवळ रुग्णांसाठी तब्बल १०० फ्लॅटचे वसतिगृह बांधन्यट आले असून याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. यातील पहिले १० फ्लॅट हे रुगालयाला सोपवण्यात आले आहे.

एक बेडरूम, हॉल किचन असे या फ्लॅटचे स्वरूप आहे. यातील १० फ्लॅट रुग्णालयाला देण्यात आले आहेत. तर उर्वरित फ्लॅट मे पर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी देशभरातून तब्बल 60 टक्के रुग्ण येत असतात. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वांद्रे येथे वसतिगृह आणि दादर आणि आसपासची छोटी एनजीओ संचालित केंद्रे आहेत. मात्र, रुग्णांची मोठी संख्या पाहता येथील केंद्र अपुरी पडतात. तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय पाहता या ठिकाणी रुग्णांसाठी वसतिगृह बांधण्याची योजना आखण्यात आली होती.

म्हाडाला देणगी मिळवून देण्यासाठी मदत करणारे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपसंचालक डॉ शैलेश श्रीखंडे म्हणाले, “या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणारे ५० टक्के रुग्ण आम्हाला निवासासाठी चौकशी करत असतात. मात्र, काही मोजक्याच रुग्णांची मागणी पूर्ण केली जाऊ शकत होती. यामुळे अनेक रुग्ण हे फूटपाथवर किंवा रुग्णालयाजवळील पुलाखाली राहठ होते. मात्र, नव्याने रुग्णांसाठी बांधण्यात येणाऱ्या या वासतिगृहामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे.

डॉ. बडवे म्हणाले, वसतिगृहाचा लाभ रुग्णांना होणार आहे. “पश्चिमेमध्ये, बहुतेक मोठी कर्करोग रुग्णालये वर्षाला २५ हजार रुग्णांवर उपचार करतात. टाटा मेमोरियल सेंटरने गेल्या वर्षी ८५,००० नवीन रुग्णांवर उपचार केले. रुग्णालय दर काही वर्षांनी वसतिगृहे उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब आणि कॉर्पोरेट देणगीदारांशी करार करते. हॉस्पिटल जवळच्या हाफकाईन कॉम्प्लेक्समध्ये ३०० खाटांचे नवे वसतिगृह बांधले जात आहे. "ही सुविधा जूनपर्यंत तयार होईल, असा विश्वास डॉ बडवे यांनी व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग