मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : कोकणात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम! असे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update : कोकणात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम! असे असेल आजचे हवामान

Apr 24, 2024, 06:41 AM IST

    • Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात तापमान वाढलेले आहे. तर आजही विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा चा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबत वादळी वारे वाहणार असल्याने घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी संकट कायम! असे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात तापमान वाढलेले आहे. तर आजही विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा चा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबत वादळी वारे वाहणार असल्याने घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    • Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात तापमान वाढलेले आहे. तर आजही विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा चा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबत वादळी वारे वाहणार असल्याने घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणात आणि मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा यवतमाळ येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा परभणीत भरपावसात एल्गार; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदी-शहांवरही निशाणा

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकल आणि सर्कुलेशन हे मराठवाडा व लगतच्या विदर्भावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळपर्यंत आहे. ही द्रोणीका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थिती मधून जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election : माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिलं; प्रियंका गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

कोकणात उष्णतेची लाट

पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील पाच दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये २५ एप्रिलला वातावरण उष्ण व दमट राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा ‘DNA’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची जीभ घसरली

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज परभणी व हिंगोलीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आज अमरावती नागपूर वर्धा व यवतमाळ येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह गारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका राहणार आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उद्या नागपूर वर्धा यवतमाळ येथे मेघ गर्जना व वीजांचा कडकडाटासह वादळी वारा आणि गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ गर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी कही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे व परिसरात आज पासून २५ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २६ व २७ एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा