मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार; ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार; ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Jul 11, 2022, 09:33 AM IST

    • राज्यात मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
मुंंबई, कोकण, कोल्हापुरात जोरदार पाऊस (PTI)

राज्यात मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

    • राज्यात मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

Maharashtra Rain: गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, (Mumbai) कोकण, कोल्हापूर, (Kolhapur) सातारा, (Satara) पुणे (Pune) या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. याशिवाय विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच गडचिरोली (Gadchiroli) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

मुंबईत रिमझिम पाऊस पडत असून पुण्यात संततधार सुरूच आहे. गडचिरोलीत मुसळदार पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

<p>राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट</p>

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस पुढचे चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात ८ जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.