मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JEE Main Result 2022: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

JEE Main Result 2022: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

Jul 11, 2022, 09:21 AM IST

    • JEE Main 2022 Session 1 Results out: अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा २०२२ सेशन १ चा निकाल जाहीर झाला आहे.
JEE Mains Exam Result (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

JEE Main 2022 Session 1 Results out: अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा २०२२ सेशन १ चा निकाल जाहीर झाला आहे.

    • JEE Main 2022 Session 1 Results out: अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा २०२२ सेशन १ चा निकाल जाहीर झाला आहे.

JEE Main 2022 Session 1 Results out: अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा २०२२ सेशन १ चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने निकाल जाहीर केला आहे. जेईई परीक्षेत पात्र होण्यासाठी खुल्या गटातील उमेदवारांना ७५ टक्के, एससी, एसटी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवावे लागतात. जेईई परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

एनटीएने सेशन १ च्या परीक्षेचा निकाल जारी केल्यानंतर यात पात्र उमेदवार सेशन २ च्या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा झाल्यानंतर एनटीएकडून जेईई अॅडव्हान्स परीक्षेची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल.

जेईई मुख्य सेशन १ चा निकाल jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येतो. या संकेतस्थळावर JEE Main 2022 Session 1 Result अशी लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती भरल्यानंतर सबमिट करावी लागेल. त्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता. या निकालाची प्रिंटही काढता येणार आहे. एनटीएकडून जेईई मुख्य परीक्षा सेशन २ ही २१ ते ३० जुलै या कालावधीत पार पडेल. यानंतर काउन्सिलिंगसाठी ऑल इंडिया रँक आणि कट ऑफची यादी जाहीर होईल.

जेईई मेन २०२२ सेशन १, पेपर १ आणि पेपर दोन परीक्षा २३ ते २९ जून या कालावधीत झाली होती. परीक्षेचं आयोजन देशभरातील ५०१ शहर आणि भारताच्या बाहेर २२ शहरांमध्ये विविध केंद्रावर करण्यात आले होते. जेईई मेन्सच्या पहिल्या पेपरमध्ये टॉपचे अडीच लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकतील. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये अॅडमिशन मिळेल. एनटीए स्कोअर जेईई अॅडव्हान्स २०२२ च्या उमेदवारांची पात्रता ठरवेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

विभाग

पुढील बातम्या