मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  TRS Vs BJP: महाराष्ट्रानंतर तेलंगणमध्येही भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा शोध

TRS Vs BJP: महाराष्ट्रानंतर तेलंगणमध्येही भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा शोध

Jul 11, 2022, 10:15 AM IST

    • TRS Vs BJP: आमच्याकडे खरंच काही रणनीती नाही तर आमचा पक्ष १८ राज्यात सत्तेत कसा काय असता? मुख्यमंत्री खूपच अपमानास्पद भाषेचा वापर करतायत असा आरोपही बंडी संजय यांनी केला.
पंतप्रधान मोदी आणि खासदार संजय बंडी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

TRS Vs BJP: आमच्याकडे खरंच काही रणनीती नाही तर आमचा पक्ष १८ राज्यात सत्तेत कसा काय असता? मुख्यमंत्री खूपच अपमानास्पद भाषेचा वापर करतायत असा आरोपही बंडी संजय यांनी केला.

    • TRS Vs BJP: आमच्याकडे खरंच काही रणनीती नाही तर आमचा पक्ष १८ राज्यात सत्तेत कसा काय असता? मुख्यमंत्री खूपच अपमानास्पद भाषेचा वापर करतायत असा आरोपही बंडी संजय यांनी केला.

तेलंगणा (Telangana) भाजपचे अध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंडी संजय (Sanjay Bandi) यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM KCR) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा दाखला देत केसीआर यांच्या राजकारणाचे काहीच दिवस राहिले असल्याचं म्हटलं आहे. टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत असंही बंडी संजय यांनी म्हटलं.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर

एका लग्नाची दुसरी गोष्ट! ७५ वर्षीय वडिलांसाठी मुलीने शोधली ६० वर्षाची नवरी, धडाक्यात लावलं लग्न

Google : काय सांगता? गुगलच्या चुकीमुळे डिलीट झाला १० हजार कोटी रुपयांचा पेन्शन फंड

बापरे.. वयाच्या ३४ व्या वर्षीच ही सेलिब्रिटी बनली आजी, स्वत:चीही आहेत ५ मुले; मात्र हे झाले कसे?

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर सत्तांतर झाले. त्याचाच उल्लेख करत बंडी संजय म्हणाले की, "तुम्ही एकनाथ शिंदेंबद्दल बोलताय. आधी तुमच्या पक्षात एकदा लक्ष द्या. मला वाटतं की टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे आहेत." केसीआर यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला होता. त्यांनीही पक्षात बंडखोरीची भीती व्यक्त केली होती.

बंडी संजय यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री केसीआर यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काय झालं हे कसं माहिती? तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही म्हणताय की भाजपकडे काही रणनिती नाही. जर आमच्याकडे खरंच काही रणनिती नाही तर आमचा पक्ष १८ राज्यात सत्तेत कसा काय असता? मुख्यमंत्री खूपच अपमानास्पद भाषेचा वापर करतायत असा आरोपही बंडी संजय यांनी केला.

भाजप खासदार जोगुलम्बा यांचा अपमान केल्याप्रकरणी केसीआर यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. खासदार बंडी संजय यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री केसीआर यांनी ज्या जोगुलम्बा मातेबाबत वक्तव्य केलं ते एक पीठ आहे. आता तुमचे दिवस मोजले जात आहेत. जेव्हा दिवस संपत येतात तेव्हा लोक असं बडबडतात. जोगुलम्बा मातेविरुद्ध बोलणं तुमच्यासाठी राजकीय अंत ठरेल. तुम्ही आधी हिंदुंची माफी मागायला पाहिजे."

तेंलगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या संजय बंडी यांनी म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्यात खूप अंतर आहे. मोदींशी तुलना करत आहात, तुम्ही देशाचे नेते आहात का? पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातले १८ तास काम करतात. तुम्ही तुमच्या फार्महाऊसमधूनही बाहेर येत नाही. तुम्ही देशाचे नेते असल्याचा दावा करता यावर प्रत्येकजण हसत आहे."

पुढील बातम्या