मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? राजकीय घडामोडींना वेग

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? राजकीय घडामोडींना वेग

Jun 21, 2022, 11:11 PM IST

    • आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट?

आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra)लागण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    • आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई –शिवसेनेचे दिग्गज नेते व महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २० ते ३० आमदारांना सोबत घेऊन बंड केल्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. महाराष्ट्राला हा धक्का पचवूपर्यंत आज संध्याकाळपर्यंत दुसरा मोठा धक्का बसू शकते. आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra)लागण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

सध्या सूरतमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासोबत शिवसेनेचे२९ बंडखोरआमदार आहेत. हे आमदार आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही,असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात. या पत्रात शिवसेनेचं नाव घेतलं जाणार नाही,असंही सांगण्यात येत आहे.दुसरीकडे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असलेले७आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सोमवारी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आणि काही आमदार मुंबईहून सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत२९आमदार असतील,तर राज्यातीलमहाविकासआघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफरही देण्यात आल्याचे समजते.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले,सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी२६-२६मते पडली. शिवसेनेची स्वत:ची संख्या५५आणि सहकारी आमदारांची मिळून संख्या६४आहे,म्हणजेच शिवसेना आणि सहकारी पक्षांचे मिळून१२आमदार फुटल्याचं काल निकाल लागल्यानंतरच स्पष्ट झाले होते.