मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवल्यानंतर, 'या' आमदाराची नियुक्ती

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवल्यानंतर, 'या' आमदाराची नियुक्ती

Jun 21, 2022, 03:39 PM IST

    • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. या पदावर अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत
शिवसेनेने गटनेता बदलला

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीएकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. या पदावरअजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत

    • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. या पदावर अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. आता, शिंदेंच्याजागी मुंबईतीलनिष्ठावंत शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असं आवाहन करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेतील या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला असून आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनेने गटनेता बदलला -

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीएकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. या पदावरअजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे २० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांना किमान ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीमध्ये केवळ १८ विधानसभा आमदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

पुढील बातम्या