मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता, नारायण राणेंच्या ट्विटने खळबळ

Narayan Rane : नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता, नारायण राणेंच्या ट्विटने खळबळ

Jun 21, 2022, 01:36 PM IST

  • एकनाथ शिंदे(Eknath Shinde) शिवसेनेवर नाराज असल्याचं जाहीर झालं आहे. अशात भाजपचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं एक ट्विट (Tweet) राजकीय वातावरणात खळबळ माजवणारं आहे  

नारायण राणे (हिंदुस्तान टाइम्स)

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) शिवसेनेवर नाराज असल्याचं जाहीर झालं आहे. अशात भाजपचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं एक ट्विट (Tweet) राजकीय वातावरणात खळबळ माजवणारं आहे

  • एकनाथ शिंदे(Eknath Shinde) शिवसेनेवर नाराज असल्याचं जाहीर झालं आहे. अशात भाजपचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं एक ट्विट (Tweet) राजकीय वातावरणात खळबळ माजवणारं आहे  

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेवर (Shiv Sena) नाराज असल्याचं जाहीर झालंय. एकनाथ शिंदे सध्या सूरत (Surat) इथल्या एका हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री फक्त राष्ट्रवादीचं (NCP) ऐकतात. पक्षातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. त्यामुळे जर भाजपसोबत (BJP) शिवसेना (Shiv Sena ) सत्ता स्थापन करणार असेल तर आम्ही शिवसेनेत असू असं एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३५ आमदारांचं म्हणणं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता नारायण राणे (Narayan Rane) यांचं एक ट्विट सध्या राज्याच्या राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काय म्हटलंय नारायण राणे यांनी पाहुया.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Pune weather update : मुंबईत उकाड्याने तर, ऊन आणि पावसाच्या खेळानं पुणेकर हैराण

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता” असं ट्विट केलं आहे.

एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सध्या भाजपशी समिकरण जुळवलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेसाठी अनेक वर्ष योगदान दिलं आहे. शिवसेना आता पूर्वीची शिवसेना राहिली नसल्याचं नारायण राणे पुन्हा पुन्हा म्हणत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचं हे ट्विट सध्या राज्यात भडकलेल्या राजकीय आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे हे नक्की आहे. मात्र शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडायची नाही असं राणे पिता पुत्र कायम करताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा हे ट्विट करुन राणेंनी सेनेला डिवचलं आहे

नारायण राणेंची शिवसेनेची कारकीर्द

 शिवसेनेत असताना नारायण राणे यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष, मंत्री आणि मुख्यमंत्री असा नारायण राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतला एक अत्यंत महत्वाचा नेता अशी नारायण राणे यांची ओळख होती. १९९९साली नारायण राणेंची मुख्यमंत्रिपदी बाळासाहेबांनी निवड केली होती. बाळासाहेब ठाकरेंनी आपला वासरदार म्हणून उद्धव ठाकरेंची निवड केल्यानंतर नारायण राणे दुखावले गेले होते.  उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची नावं निवडताना आम्हाला अंधारात ठेवलं आणि परस्पर उमेदवारांची नावं बदलली असल्याचा आरोप करत नारायण राणे शिवसेनेतनं बाहेर पडले होते तसा उल्लेख नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. 

पुढील बातम्या