मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde Revolt: शिवसेनेला कुठलाही तडा गेलेला नाही - संजय राऊत

Eknath Shinde Revolt: शिवसेनेला कुठलाही तडा गेलेला नाही - संजय राऊत

Jun 21, 2022, 04:31 PM IST

    • Sanjay Raut on Eknath Shinde: बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Eknath Shinde - Sanjay Raut

Sanjay Raut on Eknath Shinde: बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

    • Sanjay Raut on Eknath Shinde: बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राहण्यासाठी थेट पक्षालाच अटी घातल्यानं शिवसैनिकांमध्येही संताप आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज याच संतप्त भावना बोलून दाखवल्या. ‘एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं पक्ष संघटनेला कुठलाही तडा गेलेला नाही,’ असं राऊत यांनी आवर्जून स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मुंबईत शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वासमोर भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. इतकंच नव्हे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी उपमुख्यमंत्री अशी विभागणी व्हावी, असंही त्यांनी सुचवल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी उद्विग्नपणे प्रतिक्रिया दिली. 'शिवसेनेत प्रस्तावाला स्थान नाही, असं त्यांनी सुनावलं.

‘एकनाथ शिंदे हे आमचे जवळचे सहकारी आहेत. त्यांनी आताच्या आणि या आधीच्या सरकारमध्येही महत्त्वाचं मंत्रिपद भूषवलं आहे. काही मुद्द्यांवर त्यांची नाराजी जरूर असू शकते. पण त्यांनी मुंबईत येऊन आमच्याशी चर्चा करायला हवी. त्यांच्या मनातील गैरसमज नक्कीच दूर होतील. सुरतमध्ये बसून चर्चा कशी होऊ शकते?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला.

‘शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना दूर केलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केल्याचं राऊत यांनी सांगितलं. 'शिवसेनेचे दोन प्रतिनिधी सुरतला शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी गेले आहेत, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेनेच्या आमदारांच्या जिवाला धोका

सुरतमध्ये शिवसेनेच्या आमदारांना जबरदस्तीनं डांबण्यात आलं आहे. त्यांच्या जिवाला धोका आहे. तिथल्या काही आमदारांनी आमच्याशी संपर्क करून ही माहिती दिली आहे. काही आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रारी केल्या आहेत. आमदारांची तातडीनं सुटका न झाल्यास मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या