मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde Live: एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना आसामला करणार 'एअरलिफ्ट'
Uddhav Thackeray - Eknath Shinde

Eknath Shinde Live: एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना आसामला करणार 'एअरलिफ्ट'

Jun 21, 2022, 11:17 PMIST

Eknath Shinde Live Updates: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं असून समेटासाठी काही अटी ठेवल्या आहेत.

Jun 21, 2022, 11:17 PMIST

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना आसामला करणार 'एअरलिफ्ट'

एकनाथ शिंदे यांच्यासोबच्या सर्व बंडखोर आमदारांचे आता सुरतवरुन एअरलिफ्ट करण्यात येत असून त्यांना आता गुवाहाटीला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. सुरतच्या हॉटेलमधून हे आमदार आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे जात आहेत. त्यासाठी विमान सुरत विमानतळावर सज्ज आहे. रात्री १ वाजेपर्यंत सर्व आमदार गुवाहाटीला पोहोचणार आहेत. आमदार पळून जाण्याची भीती एकनाथ शिंदे यांना सतावत आहे.

Jun 21, 2022, 10:52 PMIST

शिवसेनेच्या २७ आमदारांना सेट रेगिज हॉटेलमध्ये हलवणार

शिवसेनेच्या २७ आमदारांना सेट रेगिज हॉटेलमध्ये हलविण्यात येणार आहे. तर सूरत मध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना गोव्यात हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

Jun 21, 2022, 10:14 PMIST

एकनाथ शिंदे माझं ऐकतील असा मला विश्वास - उद्धव ठाकरे

पक्षाविरोधात बंड पुकारलेल्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना एका बाजूने कडक संदेश आणि दुसऱ्या बाजूने मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.तर एकनाथ शिंदेवर माझं ऐकतील आणि परत येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आमदार- खासदारांची आज एक बैठक पार पाडली त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Jun 21, 2022, 10:14 PMIST

महाविकास आघाडीची वर्षा बंगल्यावर बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे माझं ऐकतील असा विश्वास उद्धव ठाकरेंकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 21, 2022, 06:42 PMIST

Eknath Shinde spoke to Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा

एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक हे सुरतला गेले होते. त्यांनी शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं करून दिलं. दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. 

Jun 21, 2022, 06:28 PMIST

Narayan Rane on Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे केवळ नामधारी नगरविकास मंत्री होते - राणे

एकनाथ शिंदे हे केवळ नामधारी नगरविकास मंत्री होते. त्यांच्या खात्यात ‘मातोश्री’मधील अनेकांचा आक्षेप होता, असा दावा नारायण राणे यांनी केला.

Jun 21, 2022, 06:22 PMIST

Narayan Rane: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. ते कशाची वाट पाहताहेत?; नारायण राणे यांचा सवाल

एकनाथ शिंदे यांच्या सोबत ३५ आमदार आहेत. सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. ते कशाची वाट पाहतायत, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

Jun 21, 2022, 06:20 PMIST

Narayan Rane: अडीच वर्षांपूर्वी भाजपची फसवणूक झाली हे एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे मान्य केलंय - नारायण राणे

शिवसेनेचे प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटले. भाजपसोबत आलात तर आम्ही विचार करू, असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. याचा अर्थ शिंदे यांची भूमिका हिंदुत्ववादी आहे. अडीच वर्षांपूर्वी फसवणूक झाली हे ते मान्य करताहेत, असा नारायण राणे म्हणाले.

Jun 21, 2022, 06:20 PMIST

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू

एकनाथ शिंदे यांना अपमानस्पद वागणूक दिली गेली. आश्वासनं देऊन फसवणूक करण्यात आली. त्यातूनच त्यांनी हे बंड केलं. बाळासाहेबांनी ४८ हून अधिक वर्षे पक्ष चालवला. वाढवला. शिवसैनिकांना वेळ, भेटी, प्रेम दिलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असूनही यातलं काहीच करता आलं नाही. त्यामुळंच गुदमरलेले शिवसैनिक व आमदारांनी हे बंड केलं आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 06:13 PMIST

Shivsena Meeting: मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुंबईतील घरी शिवसेना नेत्यांची बैठक

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणखी आमदार जाऊ नयेत म्हणून शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुंबईतील घरी शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे. शिंदे समर्थक आमदारांची मनधरणी केली जात आहे. सरकार वाचवण्याएवढा आकडा राखण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे.

Jun 21, 2022, 04:13 PMIST

Maharashtra Congress MLA: काँग्रेसचे सर्व आमदार वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात. अफवांवर विश्वास ठेवू नये, काँग्रेस पक्षाचं आवाहन

काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. काही आमदार नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या व असत्य आहेत, असं काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jun 21, 2022, 03:28 PMIST

Sanjay Raut on Eknath Shinde: शिवसेनेचे दोन प्रतिनिधी सुरतला गेले आहेत - संजय राऊत

शिवसेनेत प्रस्तावाला स्थान नाही. नाराजी असू शकते. पण त्यांनी मुंबईत येऊन आमच्याशी चर्चा  करावी. त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतील. सुरतमध्ये बसून चर्चा कशी होऊ शकते. शिवसेनेचे दोन प्रतिनिधी सुरतला चर्चेसाठी गेले आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 03:28 PMIST

Eknath Shinde News Live: शिवसेनेच्या आमदारांना जबरदस्तीनं सुरतमध्ये डांबलंय; संजय राऊत यांचा आरोप

शिवसेनेच्या आमदारांना जबरदस्तीनं सुरतमध्ये डांबलं आहे. त्यांच्या जिवाला धोका आहे असं खुद्द काही आमदारांनी आम्हाला सांगितलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Jun 21, 2022, 03:28 PMIST

Eknath Shinde News Live: एकनाथ शिंदे यांच्यासाठी चर्चेसाठी मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक सुरतला रवाना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक हे सुरतला रवाना झाले आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Jun 21, 2022, 03:16 PMIST

Chandrakant Patil on Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी भाजपचा काही संबंध नाही - चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात जे काही बंड केलंय, त्याच्याशी शिवसेनेचा काही संबंध नाही. यात पूर्वनियोजित असं काही नव्हतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 03:14 PMIST

Chandrakant Patil on Eknath Shinde: सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत - चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आम्ही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहोत. याबाबत आताच काही बोलणं खूप घाईचं होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 02:11 PMIST

Sharad Pawar: शिवसेनेची भूमिका कळेपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही - शरद पवार

सध्याच्या पेचप्रसंगात शिवसेनेची भूमिका काय आहे, ते आम्हाला कळेपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Jun 21, 2022, 02:09 PMIST

Sharad Pawar: एकनाथ शिंदे प्रकरण हे शिवसेनेतील अंतर्गत प्रकरण - शरद पवार

एकनाथ शिंदे यांचं प्रकरण हे शिवसेनेतील अंतर्गत प्रकरण आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. आमच्या पक्षाचीही बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी देखील चर्चा करू, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Jun 21, 2022, 02:06 PMIST

Sharad Pawar Press Conference: आता सुरू असलेल्या संकटातून काहीतरी मार्ग निघेल - शरद पवार

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संकटातून काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. 

Jun 21, 2022, 02:06 PMIST

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ती मागील अडीच वर्षातील तिसरी घटना आहे. सुरुवातीलाही असंच झालं होतं. त्यानंतर सरकार बनलं आणि सर्व काही सुरळीत सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.

Jun 21, 2022, 02:06 PMIST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद

Jun 21, 2022, 01:07 PMIST

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड हे ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

Jun 21, 2022, 12:59 PMIST

Chandrakant Khaire on Eknath Shinde: तीन पक्षांचं सरकार आहे म्हटल्यावर नाराजी असणं साहजिक आहे - चंद्रकांत खैरे

सर्व आमदार व मंत्री शिवसेनेसोबत आहेत. ते कुठंही जाणार नाहीत, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. तीन पक्षांचं सरकार म्हटल्यावर नाराजी असणं साहजिक आहे. यापूर्वी दोन पक्षांचं सरकार असतानाही ती होतीच, नाराजी दूरही होऊ शकते, असंही खैरे यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 12:54 PMIST

Eknath Shinde: भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव पक्ष नेतृत्वापुढं ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव असल्याचं समजतं.

Jun 21, 2022, 12:52 PMIST

Eknath Shinde: वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू

शिवसेनेच्या आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे दादा भुसे, अंबादास दानवे, संजय राठोड आणि संतोष बांगर हे मुंबईतील एका हॉटेलात होते. त्यांना शिवसैनिकांनी सुरक्षेत वर्षा निवासस्थानी आणलं आहे.

Jun 21, 2022, 12:12 PMIST

NCP Meeting: शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बोलावली तातडीची बैठक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळं राज्य सरकार धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. अनेक नेते आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना झाले आहेत.

Jun 21, 2022, 12:12 PMIST

Shivsena MLA Meeting: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली आमदारांची बैठक

एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह सुरतला रवाना झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत २६ आमदार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोणते आमदार उपस्थित राहतात यावरून शिंदे यांच्यासोबत आहेत हे स्पष्ट होणार आहे.

Jun 21, 2022, 11:53 AMIST

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Jun 21, 2022, 11:53 AMIST

Eknath Shinde Live Updates: एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

शिवसेनेत नाराज असलेले एकनाथ शिंदे हे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ते भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Jun 21, 2022, 11:49 AMIST

Ekanth Shinde Live: एकनाथ शिंदे हे चर्चेसाठी तयार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुरतला रवाना

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क केला असून ते चर्चेसाठी तयार झाले आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याला चर्चेसाठी सुरतला बोलावण्यात आलं आहे. हा नेता कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Jun 21, 2022, 11:48 AMIST

Sanjay Raut slams BJP: एकनाथ शिंदे प्रकरणावरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

एकनाथ शिंदे व काही आमदारांच्या या कथित बंडामागे भाजप असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 'भाजपनं एक घाव सकाळच्या शपथविधीच्या निमित्तानं घालण्याचा प्रयत्न केला होता. आताही दुसरा डाव खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांचा हा डावही फोल ठरेल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

Jun 21, 2022, 11:45 AMIST

Sanjay Raut on Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झालाय - संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे. त्यांच्यासोबत असलेले काही आमदार स्वत:हून संपर्क साधत आहेत. जे काही आहे ते समोर येईलच. पण एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी आहेत. कट्टर शिवसैनिक आहेत, ते गद्दारी वगैरे करणं शक्य नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 11:45 AMIST

Chandrakant Patil on Eknath Shinde: एकनाथ शिंदे प्रकरण हा शिवसेनेचा अंतर्गत वाद - चंद्रकांत पाटील

गुजरातमध्ये एकनाथ शिंदे यांचं कुणीतरी ओळखीचं असेल, म्हणून ते तिथं गेले असतील. तिथं सुरक्षित वाटलं असेल त्यांना. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेत, हा शिवसेनेतील अंतर्गत वाद आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 11:45 AMIST

Eknath Shinde Live Updates: शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडाच्या पवित्र्यात?

राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे. काही आमदार व मंत्र्यांसह ते गुजरात राज्यातील सुरत इथं पोहोचले आहेत. त्यामुळं शिवसेनेत व राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

    शेअर करा