मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar: महाराष्ट्र तुम्हाला असातसा वाटला का?; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार भडकले!

Ajit Pawar: महाराष्ट्र तुम्हाला असातसा वाटला का?; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार भडकले!

Nov 24, 2022, 12:52 PM IST

  • Ajit Pawar Slams Basavaraj Bommai: महाराष्ट्राच्या सांगली व सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अजित पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Basavaraj Bommai - Ajit Pawar

Ajit Pawar Slams Basavaraj Bommai: महाराष्ट्राच्या सांगली व सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अजित पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत.

  • Ajit Pawar Slams Basavaraj Bommai: महाराष्ट्राच्या सांगली व सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अजित पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Ajit Pawar Slams Basavaraj Bommai: महाराष्ट्रातील ४० गावं कर्नाटकात येणार असल्याच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं असतानाच आता सोलापुरातील काही गावांवर बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेते अजित पवार भडकले आहेत. तुम्ही महाराष्ट्राला असातसा समजता का?,' असं अजित पवार यांनी बोम्मईंना सुनावलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बैठक होत आहे. या बैठकीसाठी आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानांवर त्यांनी यावेळी तीव्र नाराजी केली. त्यांच्या स्पष्ट शब्दांत धिक्कार केला. 'तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असातसा वाटला का? असं अजित पवार यांनी सुनावलं.

'सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारलं आहे कळत नाही. कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य करत आहेत. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवलं आहे. त्यांनी अशी वक्तव्य करणं ताबडतोब थांबवावं. लोकांचं लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरून हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक शब्दात त्यांना सुनावलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. त्यांनी यात ताबडतोब लक्ष घालावं, असं अजित पवार म्हणाले. 

'केंद्र सरकारनं देखील यात तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्यं कदापि खपवून घेणार नाही. कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. तिथं जे काही म्हणणं मांडायचं आहे, ते कर्नाटकनं मांडावं. तिथं जे काही व्हायचं ते होईल, असं अजितदादा म्हणाले.

महाराष्ट्र सरकारनं भूमिका मांडावी!

'प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंध ठेवण्याचं काम केलं आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत आहेत. महाराष्ट्र सरकारनं यावर आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा