मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MH-CET परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याची विधानसभेत मागणी

MH-CET परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याची विधानसभेत मागणी

Aug 23, 2022, 02:31 PM IST

    • Dhananjay Munde on MH-CET: एमएच-सीईटी परीक्षेतील गोंधळासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारकडं केली आहे.
MH CET

Dhananjay Munde on MH-CET: एमएच-सीईटी परीक्षेतील गोंधळासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारकडं केली आहे.

    • Dhananjay Munde on MH-CET: एमएच-सीईटी परीक्षेतील गोंधळासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारकडं केली आहे.

Maharashtra Assembly Session: राज्यातील MH-CET परीक्षेच्या वेळी झालेल्या गोंधळाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या गोंधळास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला. 'राज्यात ५ ते २० ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या MH-CET परीक्षेत झालेला गोंधळ व तांत्रिक बिघाडामुळं अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवट राहिले. सतत लॉग आउट होण्यासारख्या असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं. लाखो विद्यार्थी या परीक्षेस बसल्याची पूर्ण कल्पना असताना देखील बेजबाबदारपणा दाखवण्यात आला. या तांत्रिक बिघाडाला जबाबदार असलेल्या कंपनीवर तसेच सेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राज्य सरकारनं कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. 

लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करून नाहक खर्च करावा लागला, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तब्बल ६ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते. त्यामुळं कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणं सेलकडून अपेक्षित होतं, मात्र उलट घडलं व ६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

'विद्यार्थ्यांना सेलनं पुन्हा परीक्षेला बसायची संधी दिली असून यासाठी अर्ज करावयास आज रात्रीपर्यंतची मुदत देण्यात आलीय, पुन्हा प्रक्रिया करायची, परीक्षेला जायचे याचा खर्च व झालेला त्रास याची नुकसानभरपाई विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरावर चौकशी करून तांत्रिक बिघाडाला जबाबदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्यावी, असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयाची दखल घेत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा