मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Govinda Death: मुंबईत गोविंदाचा मृत्यू; अजित पवारांनी सरकारला खुलासा करायला भाग पाडले!

Mumbai Govinda Death: मुंबईत गोविंदाचा मृत्यू; अजित पवारांनी सरकारला खुलासा करायला भाग पाडले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 23, 2022 01:39 PM IST

Ajit Pawar on deceased govinda Sandesh Dalvi: उपचारादरम्यान मृत्यू झालेला गोविंदा संदेश दळवी यांच्या कुटुंबीयांना तात्काळ १० लाख रुपये द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar on govinda Sandesh Dalvi death: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गोविंदा पथकांसाठी व थर लावणाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. दहीहंडीतील जखमी व मृत गोविंदांच्या संदर्भातील चर्चेचा स्थगन प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आला. त्यामुळं आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अखेर सरकारला यावर खुलासा करायला भाग पाडले.

दहीहंडी उत्सवात मृत व जखमी झालेल्या गोविंदाना मदत करणार का, असा स्थगन प्रस्ताव शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मांडला होता. तो स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला होता. मात्र, आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा अजित पवार यांनी लावून धरला.

करोना काळात सण, उत्सव साजरे करता आले नव्हते, मात्र यावर्षी सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना दहीहंडीमध्ये अनेक तरुण रचलेल्या थरावरून कोसळून जखमी झाले आहेत तर मुंबईत संदेश दळवी (वय २३) या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या नातेवाईकांना तात्काळ दहा लाख द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्यात अनेक गोविंदा दहीहंडीचे थर लावताना जखमी झाले आहेत. आधी जाहीर केल्याप्रमाणं सरकार जखमींनाही मदत देणार आहे का? यावर खुलासा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. संदेश दळवी याच्यावर उपचाराचा खर्च करण्यात आला आहे. आता त्याच्या घरच्यांना मदत दिली जाणार आहे. इतर जखमी गोविंदांनाही मदत दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग