मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईची अवस्था 'गरीब की जोरू, सबकी भाभी', भाजप आमदाराची जीभ घसरली

मुंबईची अवस्था 'गरीब की जोरू, सबकी भाभी', भाजप आमदाराची जीभ घसरली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 23, 2022 12:20 PM IST

Yogesh Sagar On Mumbai: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज चौथ्या दिवशी मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बोलताना भाजप आमदाराची जीभ घसरली.

भाजप आमदार योगेश सागर यांचे मुंबईबाबत वादग्रस्त विधान
भाजप आमदार योगेश सागर यांचे मुंबईबाबत वादग्रस्त विधान (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Yogesh Sagar On Mumbai: मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात आज विधानसभेत चर्चा झाली. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं की, सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार योगेश सागर यांची जीभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह शब्दात मुंबईचा उल्लेख केल्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या मृत्यूच्या घटना अलिकडेच घडल्या आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बोलताना भाजपचे आमदार योगेश सागर हे मुंबईच्या रस्त्यावर किती संस्था काम करतायत असा प्रश्न उपस्थित करताना म्हणाले की, मुंबईची अवस्था 'गरीब की जोरू, सबकी भाभी' अशी झालीय. आता त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबईबाबत याआधी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता योगेश सागर यांनी विधानसभेतच असं वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईतल्या सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. पुढच्या दोन वर्षात मुंबईत खड्डे शोधूनही सापडणार नाहीत. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करणार. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याची माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मुंबईतील ६०३ किलोमीटर रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचंही ते म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या