मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानभवनासमोर सातारच्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून

विधानभवनासमोर सातारच्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 23, 2022 12:55 PM IST

Farmer Suicide Attempt: विधानभवानाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे.

विधानभवन
विधानभवन (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Farmer Suicide Attempt: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, विधानभवानाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती साताऱ्यातील कांदळगावचा असल्याचं समोर आलं आहे. व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ला पेटवून घेतलं. यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आणि देशमुख यांना रुग्णालयात दाखल केलं. शेतीच्या वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.

विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दाही सध्या गाजत आहे. आज पुन्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. ‘ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा..’अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

IPL_Entry_Point

विभाग