मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांमागील मास्टरमाइंड कोण?; अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar : महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांमागील मास्टरमाइंड कोण?; अजित पवारांचा सवाल

Dec 17, 2022, 02:51 PM IST

  • Ajit Pawar speech in Maha Vikas Aghadi Mahamorcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीनं काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar

Ajit Pawar speech in Maha Vikas Aghadi Mahamorcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीनं काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

  • Ajit Pawar speech in Maha Vikas Aghadi Mahamorcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीनं काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar on Insult of Shivaji Maharaj : 'माणसाकडून एखाद्या वेळेस चूक होऊ शकते. चूक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची पद्धत असते. हीच महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आहे. पण महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्यांकडून तसं होताना दिसत नाही. सतत अपमानास्पद बोलण्याचं हे धाडस कुठून येतंय? याचा अर्थ हे ठरवून सुरू असून यामागे कोणीतरी आहे. हा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केलं. राज्यपाल व इतर दोषींची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात महाविकास आघाडीनं आज मुंबईत विराट मोर्चा काढला. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाराष्ट्रप्रेमी मोर्चात सहभागी झाले होते. आझाद मैदान इथं अजित पवार यांनी मोर्चाला संबोधित करताना राज्यातील सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला. 'महाराष्ट्राच्या मातीला दुहीचा, फुटीचा शाप आहे, हे दुर्दैवानं खरं असलं तरी जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर संकट येतं तेव्हा महाराष्ट्र एकजूट होतो हा इतिहास आहे. आज हीच एकजून दिसली आहे. ही गर्दी व उत्साह बघून सत्ताधाऱ्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही,' असा दावा त्यांनी केला.

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. इतर नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. महापुरुषांच्या अपमानाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही संसदीय मार्गाचाही वापर करणार आहोत. येत्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार आहोत. महापुरुषांच्या अपमानाविरोधात कायदा करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जाईल. तसं बिल सत्ताधारी पक्षांनी आणावं, त्याला विरोधी बाकावरील सर्व सदस्य पाठिंबा देतील, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे टूलकिट चालवणारे कोण?

सीमावादावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 'बेळगाव, कारवार, भालकी, निप्पाणीसह गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात नेण्याचं कुठून सुरू झालं? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट बनावट असल्याचं सांगून वेळ मारून नेली. पण ते बनावट ट्वीट केलं कुणी? त्यासाठी फूस लावली कोणी? हे टूलकिट कुठून सुरू झालं?,' असा सवाल अजित पवार यांनी केला. 'सीमाप्रश्नावर कर्नाटक अरेरावी करत असताना कर्नाटक बँकेत खाती उघडण्याचा जीआर आपल्या सरकारनं काढला. त्यामुळं सीमावादावर त्यांचं पुतणा मावशीचं प्रेम लक्षात आलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा