मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena : शिवसैनिकांच्या इन्काऊंटरसाठी पोलीस सुपाऱ्या घेतायंत; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Shivsena : शिवसैनिकांच्या इन्काऊंटरसाठी पोलीस सुपाऱ्या घेतायंत; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Oct 19, 2022, 05:04 PM IST

    • Ambadas Danve On BJP : राजकीय संस्कृतीच्या खोट्या थापा मारणारा भाजप अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीतून पळून गेल्याचाही आरोप दानवेंनी केला.
Ambadas Danve On BJP (HT)

Ambadas Danve On BJP : राजकीय संस्कृतीच्या खोट्या थापा मारणारा भाजप अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीतून पळून गेल्याचाही आरोप दानवेंनी केला.

    • Ambadas Danve On BJP : राजकीय संस्कृतीच्या खोट्या थापा मारणारा भाजप अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीतून पळून गेल्याचाही आरोप दानवेंनी केला.

Ambadas Danve On BJP : शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करत त्यांचा इन्काऊंटर करण्याचा प्लॅन होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी आज नवी मुंबईत मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना अंबादास दानवेंनी महाराष्ट्र पोलीस आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

मोर्चात शिवसैनिकांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आजचा मोर्चा फक्त नवी मुंबईचा आहे. माझा राज्यातील सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना इशारा आहे की आमच्या नादी लागू नका. नाही तर लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यांनी आम्हाला जन्मजात लढायला शिकवल्याचं सांगत दानवेंनी पोलिसांवर टीका केली आहे.

अनेक पोलीस अधिकारी आमचे चांगले मित्र आहेत. परंतु मुंबईतील एक पोलीस अधिकारी कुणाची तरी सुपारी घेऊन शिवसैनिकांना इन्काऊंटर करण्याच्या धमक्या देत आहे. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी शिवसैनिकांसमोर येऊन हात लावून दाखवावं, असं खुलं आव्हान अंबादास दानवेंनी पोलिसांना दिल्यानं आता त्यावरून वादंग पेटण्याची शक्यता आहे.

आम्ही शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असल्यानंच आमच्यावर हल्ले केले जात आहे. शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला करण्यात आला असून त्याला आम्ही घाबरत नसल्याचं दानवे म्हणाले. याशिवाय सत्ताधारी खोके सरकारचे माजलेले आमदार गोळीबार करण्याची भाषा करतायंत, तर एक जण कार्यकर्त्यांना हातपाय तोडण्याची भाषा करत टेबल जामीन देण्याचं वक्तव्य करतोय. दुसरीकडे हे घाबरलेलं सरकार शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा देत असून यांना जनताच यांना तडिपार करणार असल्याचंही दानवे म्हणाले.