मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi: खर्गे अध्यक्ष होणार हे राहुल गांधींना निकालाआधीच कसं कळलं? हा व्हिडिओ पाहाच!

Rahul Gandhi: खर्गे अध्यक्ष होणार हे राहुल गांधींना निकालाआधीच कसं कळलं? हा व्हिडिओ पाहाच!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 19, 2022 03:16 PM IST

Congress President Election Result 2022 : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला आहे. त्यामुळं हा G23 गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Congress President Election Result 2022
Congress President Election Result 2022 (AP)

Congress President Election Result 2022 : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गेंनी बाजी मारली आहे. तब्बल ७८९७ मतं मिळवत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरुर यांचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळं आता खर्गे हे कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत. कॉंग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर बिगरगांधी घराण्यातला अध्यक्ष मिळणार आहे. परंतु या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना भारत जोडो यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना खरगे हेच कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार असल्याचे संकेत राहुल गांधींनी दिले होते, त्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर खर्गेंचा विजय झाला असून थरुरांचा दारुण पराभव झाला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पत्रकारांनी त्यांना नव्या अध्यक्षाबद्दल प्रश्न केला असता त्यावर राहुल गांधींनी 'ते मल्लिकार्जुन खर्गेंना विचारा, माझी पक्षात भूमिका काय असेल हे ही खर्गेच ठरवतील', असं वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगेंचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळं खरगे विजयी होणार हे राहुल गांधींना माहिती होतं का?, याबद्दल प्रश्न निर्माण होत आहे.

मतमोजणीत फेरफार झाल्याचा शशी थरुरांचा आरोप...

आज दुपारी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर G23 गटाकडून उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यासंदर्भात पराभूत उमेदवार शशी थरुर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point