मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'हिंदुत्वासाठी पक्ष सोडला, मग मंत्रिपदासाठी भांडणं का?', खडसेंचा शिंदेंना सवाल

'हिंदुत्वासाठी पक्ष सोडला, मग मंत्रिपदासाठी भांडणं का?', खडसेंचा शिंदेंना सवाल

Jul 16, 2022, 03:08 PM IST

    • MLC Eknath Khadse On Shinde Govt : शिवसेनेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून फारकत घेतल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी वेगळा गट तयार करत भाजपसोबत सत्ता स्थापली होती. आता कॅबिनेट विस्ताराच्या मुद्यावरून खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे.
MLC Eknath Khadse On Fadnvis-Shinde Govt (HT)

MLC Eknath Khadse On Shinde Govt : शिवसेनेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून फारकत घेतल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी वेगळा गट तयार करत भाजपसोबत सत्ता स्थापली होती. आता कॅबिनेट विस्ताराच्या मुद्यावरून खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

    • MLC Eknath Khadse On Shinde Govt : शिवसेनेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून फारकत घेतल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी वेगळा गट तयार करत भाजपसोबत सत्ता स्थापली होती. आता कॅबिनेट विस्ताराच्या मुद्यावरून खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

MLC Eknath Khadse On Fadnvis-Shinde Govt : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली, मग मुद्दा हिदुत्त्वाचा आहे तर मंत्रिपदासाठी भांडणं का?, असा सवाल राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंदेंना विचारला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत आणि कामं होत नसल्याची तक्रार करत हे लोक सत्तेतून बाहेर पडले, मग मंत्रिपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्यात एकमत होत नसल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. ते जळगावात आले असता त्यांनी तिथं पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

शिवसेनेतील बंडखोर आमदारांना हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा वाटला तर आता बंडखोर आमदारांनी मंत्रिमंडळात आम्हाला घ्या हे सांगण्याची गरजच नाही. हिंदुत्वावर आले ना, मग हिंदुत्व हेच तुमचे ध्येय असायला हवं, त्यासाठी मंत्रीपद कशाला हवंय?, त्यामुळं हिंदुत्त्व हा केवळ सांगण्यासारखा प्रकार दिसतोय, अनेक आमदारांची पक्षातून बाहेर पडण्याची कारणं वेगवेगळी असल्यानं त्यांनी आता एकमत करण्याची गरज असल्याचंही खडसेंनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या विविध निर्णयांना शिंदे सरकारनं दिलेल्या स्थगितीवर बोलताना खडसे म्हणाले की 'कोणतंही नवीन सरकार आलं तर ते जून्या सरकारच्या काही नियमांना रद्द करतच असतं, परंतु शिंदे सरकारनं ठाकरेंच्या नामांतरासह काही निर्णयांना दिलेली स्थगिती ही तात्पूरती असू शकते, काही प्रश्न अत्यंत भावनिक असतात, परंतु या सरकारला हे निर्णय परत घ्यावे लागतील', असं खडसे यांनी सांगितलं. परंतु जर विकासकामांना स्थगिती देऊन ते रद्द केले जात असतील तर त्यामुळं जनतेचं फार मोठं नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान शिंदे सरकार स्थापन होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं होतं. आता राष्ट्रपती निवडणुक पार पडल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.