मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aditya Thackeray : सत्तांतर झाल्यापासून राज्यात मोगलाई; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप

Aditya Thackeray : सत्तांतर झाल्यापासून राज्यात मोगलाई; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप

Jan 13, 2023, 06:34 PM IST

    • Aditya Thackeray PC : गेल्या सहा महिन्यांपासून सत्ताधारी स्वत:ला खोके आणि राज्याला धोके देत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
Aditya Thackeray On Shinde-Fadnavis Govt (HT)

Aditya Thackeray PC : गेल्या सहा महिन्यांपासून सत्ताधारी स्वत:ला खोके आणि राज्याला धोके देत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

    • Aditya Thackeray PC : गेल्या सहा महिन्यांपासून सत्ताधारी स्वत:ला खोके आणि राज्याला धोके देत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Aditya Thackeray On Shinde-Fadnavis Govt : मुंबई महापालिकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. पालिकेतील टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून त्याद्वारे कंत्राटदारांना तब्बल ४८ टक्क्यांचा फायदा झाल्याचाही धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यामुळं आता यावरून शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून बिघडलेल्या कायदा व सुवस्थेच्या प्रश्नावरूनही आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

मुंबईत माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत गणपतीचं विसर्जन होत असताना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी चावण्यात आली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीही करण्यात आली तरीदेखील आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळं आता राज्यात मोगलाईचं सरकार आल्यासारखं वाटत असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

सत्तांतर झाल्यापासून विरोधकांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. परंतु सरकार स्वत:ला खोके आणि शेतकऱ्यांना धोके देत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा महापुरुषांचा अपमान करूनही त्यांना सत्ताधाऱ्यांकडून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकल्प दुसऱ्या राज्यांत घालवून महाराष्ट्रात लुटण्याचा घाट घातला जात असल्याचाही आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एनआयटी घोटाळ्याचं प्रकरण बाहेर काढलं. परंतु त्यावरही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.