मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Korean Youtuber: कोरियन तरुणीचा मुंबईत विनयभंग; भर रस्त्यात जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न

Korean Youtuber: कोरियन तरुणीचा मुंबईत विनयभंग; भर रस्त्यात जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न

Dec 01, 2022, 04:55 PM IST

  • Korean Youtuber harassed in Mumbai: कोरियन यूट्यूबर तरुणीचा मुंबईत भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Molestation

Korean Youtuber harassed in Mumbai: कोरियन यूट्यूबर तरुणीचा मुंबईत भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • Korean Youtuber harassed in Mumbai: कोरियन यूट्यूबर तरुणीचा मुंबईत भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Korean Youtuber harassed in Mumbai: महिलांसाठी सुरक्षित शहर समजल्या जाणाऱ्या मुंबईत एका कोरियन तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण कोरियाची ही तरुणी यूट्यूबर असून ती लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना ही घटना घडली. या लाजिरवण्या घटनेचा जवळपास मिनिटभराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. कोरियन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना खार पोलिसांनी अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

मोबीन चांद मोहम्मद शेख (१९) आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी (२०) अशी या आरोपींची नावं आहेत. मंगळवारी रात्री कोरियन तरुणी खार इथं लाइव्ह रेकॉर्डिंग करत असताना आरोपींपैकी एक जण तिच्याजवळ आला आणि थेट तिचा हात पकडला. लिफ्ट देतो असं सांगून तो तिला ओढू लागला. सुरुवातीला तिला काही कळलं नाही. मात्र, त्यानंतर लगेचच सावध होत तिनं प्रतिकार केला. तरुणी ऐकत नसल्याचं पाहून आरोपीनं थेट तिच्या मानेभोवती हात घालून जबरदस्तीनं तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मला लिफ्टची गरज नाही. मी जवळच राहते, मी एकटी घरी जाईन, असं म्हणत तिनं कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. हा सगळा प्रकार तिच्या मोबाइल कॅमेऱ्यातही कैद झाला.

मायोची इन असं या कोरियन तरुणीचं नाव असून तिनं स्वत: ट्वीट करून याबद्दल लिहिलं आहे. 'काल रात्री लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना एका व्यक्तीनं माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत त्याचा एक मित्रही होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, असं तिनं म्हटलं आहे. मनमोकळी बोलत असल्यानं काही लोकांनी मलाच चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं लाइव्ह स्ट्रीमिंग करावं का असा प्रश्न मला पडलाय,' असंही तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी या तरुणीच्या ट्वीटला तात्काळ प्रतिसाद देत तिला आपली माहिती देण्यास सांगितलं. त्यानंतर वेगानं हालचाली करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा