मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan girl Murder : कल्याण हादरले! नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा चिरून हत्या

Kalyan girl Murder : कल्याण हादरले! नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा चिरून हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 01, 2022 02:51 PM IST

Kalyan Crime : एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने कल्याण हादरले आहे. या प्रकरणी एका संशयीताला अटक करण्यात आली आहे.

कल्याण क्राइम
कल्याण क्राइम (HT_PRINT)

कल्याण : एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे कल्याण हादरले असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी देखील अल्पवयीन आहे. मृत मुलगी आणि संशयित आरोपी दोघेही फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी एका नऊ वर्षांच्या मुलीचा गळा चिरलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेत आढळला होता. यावरुन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. स्थानिक नागरिकांनी याची माहिती ही महात्मा फुले पोलिसांना दिली.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना केली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले. दरम्यान तपासात ही मुलगी फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तयानुसार तपासाचे धोरण ठेवत आरोपीचा शोध पोलिस घेत होते. तयानुसार एका अल्पवयीन मुलावर पोलिसांना संशय आला असून त्यानेच या मुलीचा गळा चिरून हत्या केली असल्याचा संशय आहे. मृत पीडितेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

ऑक्टोबर महिन्यात कल्याण पश्चिमेत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग