मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: पाच लाख रुपये टोकन देऊन बीएमडब्लू ऐटीत घरी घेऊन गेला, बाकीचे पैसे द्यायची वेळ येताच…

Pune: पाच लाख रुपये टोकन देऊन बीएमडब्लू ऐटीत घरी घेऊन गेला, बाकीचे पैसे द्यायची वेळ येताच…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 01, 2022 02:20 PM IST

pune crime news : पुण्यात एकाने बीएमडब्लु विकत घेऊन केवळ टोकन अमाऊंट देऊन उर्वरित पैसे न देता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : पुण्यात मुंडवा येथे एकाने पाच लाख रुपये टोकन अमाऊंट देऊन उर्वरित रक्कम न देता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. केवळ पाच लाख रुपये देऊन त्यांनी उर्वरित रक्कम न देता ही फसवणूक केली आहे.

नितील हरी वाटवे (रा. नांदेड सिटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे सिक्युरिटी ऑफिसर आहेत. ते ज्यांच्या कडे काम करतात त्यांना ३५ लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांची बीएमडब्लु ही कार विकून पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानुसार नितीन वाटवे याने त्यांची कार घेण्यास उत्सुकता दाखवली. त्यानुसर वाटवे यांनी कार घेण्यासाठी ५ लाख रुपये टोकन म्हणून दिले.

यानंतर उर्वरित रक्कम देतो असे सांगून त्यांची कार वाटवे हा घेऊन गेला. यानंतर इंगळे यांनी उर्वरित पैसे देण्यास वाटवे याच्या कडे वारंवार मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तब्बल दोन वर्षांपासूण त्याने पैसे न दिल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाटवे हा सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून फावसणूकीच्या घटना वाढल्या आहेत. कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्यावी तसेच सर्व चौकशी करून पुढील निर्णय घ्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग