मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  साताऱ्याजवळ भीषण अपघात, कोल्हापूरच्या एका वारकऱ्याचा मृत्यू; 30 जण जखमी

साताऱ्याजवळ भीषण अपघात, कोल्हापूरच्या एका वारकऱ्याचा मृत्यू; 30 जण जखमी

Jun 19, 2022, 12:24 PM IST

    • कोल्हापूरहून आळंदी-पंढरपूर दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला.
अपघातग्रस्त ट्रक

कोल्हापूरहून आळंदी-पंढरपूर दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला.

    • कोल्हापूरहून आळंदी-पंढरपूर दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला.

सातारा पुणे महामार्गावर (Satara-Pune Road ) शिरवळ हद्दीत असलेल्या पुणे स्टॉपवर भीषण अपघात झाला. यामध्ये आयशर टेम्पोने दींडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली आहे. यामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. हे वारकरी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भादोले इथून आळंदी-पढरपूर पायी दिंडीसाठी निघाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

याबबात मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातून आळंदी ते पंढरपूर वारीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वारकरी निघाले होते. दोन ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरमध्ये महिलांसह ४३ वारकरी होते. सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर शिरवळ गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यानं तो महामार्गावर मध्यभागी असलेल्या विजेच्या खांबावर आदळला. त्यानंतर दिंडी सोहळ्याला निघालेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यामुळे ट्रॅक्टरमधील वारकरी महामार्गावर उडून पडले.

आयशर टेम्पोने दिलेली धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात मायप्पा कोंडिबा माने (वय ४५, भादोले) यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. तर मारुती भैरवणात कोळी यांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आणि शिरवळ पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. एकूण ४३ जणांपैकी ३० जण गंभीर जखमी आहेत तर ११ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समजते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ४ तास खोळंबली होती.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा