मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Haj Yatra 2022: हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबईहून रवाना

Haj Yatra 2022: हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबईहून रवाना

HT Marathi Desk HT Marathi

Jun 18, 2022, 11:53 PM IST

    • सौदी अरेबियात होत असलेल्या हज यात्रेसाठी ४१० मुस्लिम यात्रेकरूंची पहिली तुकडी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली.
हज यात्रेसाठी मुंबईतून पहिली तुकडी रवाना

सौदी अरेबियात होत असलेल्या हज यात्रेसाठी ४१० मुस्लिम यात्रेकरूंची पहिली तुकडी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली.

    • सौदी अरेबियात होत असलेल्या हज यात्रेसाठी ४१० मुस्लिम यात्रेकरूंची पहिली तुकडी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली.

मुंबई – मुंबईतून हज यात्रेसाठी (Haj Yatra 2022) पहिली तुकडी रवाना झाली आहे. सौदी अरेबियात होत असलेल्या हज यात्रेसाठी ४१० मुस्लिम यात्रेकरूंची पहिली तुकडी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘हज प्रस्थान बिंदू’ वरून एकूण ८००० यात्रेकरू हज यात्रेसाठी (Haj Yatra 2022) रवाना होणार असून त्यांच्यासाठी मुंबईहून १९ विशेष विमानांचे बुकिंग केले आहे.केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

भारतातून यावर्षी ७९,२३७ मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जाणार असून यापैकी ५० टक्के महिला यात्रेकरूंचा समावेश आहे. महाराष्ट्रातून एकूण ४,८७४ यात्रेकरूंनी हज-२०२२ साठी नोंदणी केली आहे.

<p>हज यात्रेसाठी मुंबईतून पहिली तुकडी रवाना</p>

हज यात्रेकरूंना यंदा अत्याधुनिक सुविधांचा पुरवठा -

हज-२०२२ साठी (Haj Yatra 2022) मुंबई व्यतिरिक्त दिल्ली,कोलकाता, बेंगळुरू,हैदराबाद, अहमदाबाद,कोची,लखनऊ,श्रीनगर आणि गुवाहाटी अशा नऊ प्रस्थान बिंदूंवरून विमानांचे बुकिंग करण्यात आले आहे. हज यात्रेसाठी यावर्षी १०० टक्के ऑनलाईन अर्जप्रक्रिया राबविण्यात आली होती. यात्रेकरूंसाठी सुधारित सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. 'डिजिटल हेल्थ कार्ड' (Digital Health Card),'ई-मसीहा आरोग्य सुविधा' (e-messiah health facility)आणि ई-लगेज प्री- टॅगिंग (E-Luggage Pre-tagging) यासह सोदी अरेबिया येथील मक्का आणि मदीना या शहरात निवास तसेच वाहतूक संबंधीची संपूर्ण माहिती देणाऱ्या अनेक ऑनलाइन / डिजिटल सुविधा हज यात्रेकरूंना पुरवण्यात आल्या आहेत.

‘भारतातील हज यात्रेकरूंनी संपूर्ण जगाच्या शांती आणि समृद्धीसाठी त्याचबरोबर मानवाला सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी प्रार्थना करावी’ असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी केले. नक्वी यांनी यात्रेकरूंना त्यांची यात्रा यशस्वी होण्‍यासाठी शुभेच्छा दिल्या.

<p>हज यात्रेसाठी मुंबईतून पहिली तुकडी रवाना</p>

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित राहून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करत यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. ‘कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे गेली दोन वर्षे सर्वच धर्मांच्या विविध उपक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. कोरोनाच्या संकटाचे मळभ आता हळू-हळू दूर होत आहे. आज दोन वर्षांनंतर हज यात्रेसाठी पहिला गट रवाना होत आहे,ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे’ असं अस्लम शेख यांनी सांगितले.

सौदी अरेबियाचे मुंबईतील रॉयल कौन्सुल जनरल एच.ई. सुलेमान बिन ईद अलोतैबी,भारतीय हज कमिटीचे अध़्यक्ष ए. पी.अब्दुल्लाकुट्टी,भारतीय हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद याकुब शेखा आणि इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या