मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Girl Suicide : मित्राला उधार दिलेले पैसे परत न केल्याने तरुणीची आत्महत्या

Pune Girl Suicide : मित्राला उधार दिलेले पैसे परत न केल्याने तरुणीची आत्महत्या

Aug 10, 2022, 06:29 PM IST

    • Pune Girl Suicide: पुण्यात एका तरुणीने एका मित्राला पैसे उधार दिले होते. मात्र, त्याने ती पैसे परत न दिल्याने तिने आत्महत्या केली.
Crime News (HT_PRINT)

Pune Girl Suicide: पुण्यात एका तरुणीने एका मित्राला पैसे उधार दिले होते. मात्र, त्याने ती पैसे परत न दिल्याने तिने आत्महत्या केली.

    • Pune Girl Suicide: पुण्यात एका तरुणीने एका मित्राला पैसे उधार दिले होते. मात्र, त्याने ती पैसे परत न दिल्याने तिने आत्महत्या केली.

पुणे : पुण्यात नर्सिंगच्या कोर्स करिता आलेल्या एका तरुणीने १५ जानेवारी २०२२ रोजी हॉस्पिटलच्या खोलीत विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. केल्याचा प्रकार घडला होता. तिच्या आत्महत्येमागे तिचा एक मित्र असून त्यास मुलीने काही पैसे उधार दिले होते आणि संबंधित पैसे तो परत करत नसल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप करत पोलिसांकडे संबंधित तक्रार दाखल केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी ठाण्यात आरोपी प्रणीत दत्तात्र्य जगताप पाटील (रा.परांडा, उस्मानाबाद) याच्या विरोधात पोलिसांनी तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मंगळवारी रात्री दाखल केला, ऐश्वर्या सुरवसे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील बालाजी मरीबा सुरुवसे (वय ४८,रा.उस्मानाबाद) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात दत्तात्र्य पाटील याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार यांची मुलगी ऐश्वर्या सुरवसे ही जानेवारी महिन्यात उस्मानाबाद येथून पुण्यात नर्सिंगच्या कोर्सकरिता बुधराणी रुग्णालयात आली होती. यापूर्वी तिने तिचा गावाकडील मित्र दत्तात्र्य पाटील यास कामा निमत्त काही हात उसने पैसे दिले होते. 

हे पैसे मुलीने वेळोवेळी मागुन सुध्दा तिस परत देण्यात आले नव्हते. तिने आरोपी दत्तात्र्य पाटील याच्याकडे पैशांची मागणी केली असता तीस परत पैसे देण्यास आरोपीने नकार देऊन तिला मानसिक त्रास दिल्याने तिने पुण्यातील हॉस्टेलवर विष प्राशन करुन आत्महत्या केली. यामुळे तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा